विक्रमी आवक! बाजारात आंब्याचा महापूर; सव्वा लाख पेट्या दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 08:32 IST2024-04-16T08:32:02+5:302024-04-16T08:32:47+5:30

विक्रमी आवक; ८५ हजार पेट्या हापूसच्या

Record arrivals A deluge of mangoes in the market A quarter of a million boxes filed | विक्रमी आवक! बाजारात आंब्याचा महापूर; सव्वा लाख पेट्या दाखल 

विक्रमी आवक! बाजारात आंब्याचा महापूर; सव्वा लाख पेट्या दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी आंब्याची विक्रमी आवक झाली आहे. एकाच दिवशी १ लाख २८ हजार पेट्या आंबा विक्रीसाठी मार्केटमध्ये दाखल झाला. यामध्ये कोकणातील हापूसच्या ८५ हजार ५६० पेट्यांचा समावेश आहे. बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये आंब्याचे राज्य सुरू झाले आहे. रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड, कर्नाटक, तामिळनाडूसह केरळमधून आंबा विक्रीसाठी येत आहे. या हंगामातील सर्वाधिक आवकेची नोंद सोमवारी झाली असून, फेब्रुवारीपासून पहिल्यांदाच एक लाख पेट्यांचा टप्पा ओलांडला आहे. 

मध्यरात्रीपासून ते सायंकाळपर्यंत कोकणातून ८५,५६० व इतर राज्यांतून ४२,८५० अशा एकूण १ लाख २८ हजार ४१० पेट्यांची आवक झाली. आवक वाढल्यामुळे बाजारभावही कमी झाले आहेत. कोकणच्या हापूसला बाजार समितीमध्ये २०० ते ८०० रुपये डझन भाव मिळत आहे. किरकोळ मार्केटमध्ये हापूस ४०० ते १२०० रुपये डझन दराने विकला जात आहे. कर्नाटकमधील हापूससदृश आंबा ७० ते १३० रुपये किलो, बदामी ४० ते ६०, तोतापुरी २५ ते ३०, लालबाग ३० ते ६०, गोळा ३५ ते ४० रुपये किलो दराने विकला जात आहे.

Web Title: Record arrivals A deluge of mangoes in the market A quarter of a million boxes filed