राज ठाकरे आज नवी मुंबईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 02:13 IST2018-08-05T02:13:49+5:302018-08-05T02:13:57+5:30
मनसेच्या महापालिका कामगार कर्मचारी सेनेच्या वतीने रविवारी वाशीत महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

राज ठाकरे आज नवी मुंबईत
नवी मुंबई : मनसेच्या महापालिका कामगार कर्मचारी सेनेच्या वतीने रविवारी वाशीत महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अमित ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
महापालिका कामगारांच्या समस्यांना वाचा फोडत मनसेने नवी मुंबईत कर्मचारी सेनेचाही जम बसवला आहे. त्यानुसार कामगारांचा पहिलाच महामेळावा रविवारी ५ आॅगस्ट रोजी वाशीत होत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवी मुंबईच्या मनसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतली पक्षाची भूमिकादेखील स्पष्ट केली जाण्याची शक्यता आहे.