Video : नवी मुंबईसह ठाण्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 21:54 IST2019-10-08T21:53:08+5:302019-10-08T21:54:41+5:30
नवी मुंबईत विजांच्या कडकडाटासह जोराच्या वाऱ्यामुळे पाऊस पडत आहे.

Video : नवी मुंबईसह ठाण्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस
नवी मुंबई - आज अनेक ठिकाणी नवरात्री उत्सवादरम्यान बसलेले घट आणि देवींचे विसर्जनाची धामधूम सुरु आहे. त्यातच नवी मुंबई आणि ठाण्यात पावसाने हजेरी लावली आहे. नवी मुंबईसह ठाण्यात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. नवी मुंबईत विजांच्या कडकडाटासह जोराच्या वाऱ्यामुळे पाऊस पडत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ठाणे - बेलापूर मार्गावर खैरणे यथे तीन विजेचे खांब तसेच दोन झाडे कोसळली आहेत.
घणसोली, कोपर खैरणेसह शहराच्या अनेक भागातला वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसेच पनवेल भागात देखील विजांचा कडकडाट असून काही परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ठाण्यात देखील जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे.
ठाण्यात जोरदार वाऱ्यासह पाऊसhttps://t.co/mD82AatBXl
— Lokmat (@MiLOKMAT) October 8, 2019
ठाण्यात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात #Rainpic.twitter.com/tx0J8ayKGE
— Lokmat (@MiLOKMAT) October 8, 2019