शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

रायगड जिल्ह्यामध्ये १,१०१ बालके कुपोषित, पाच वर्षांत दुप्पट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 02:18 IST

राज्यात २०१६मध्ये १८ हजार बालमृत्यू झाले, असे सरकारी आकडेच सांगतात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस) २००५-२००६च्या तुलनेत २०१५-१६ मध्ये राज्यात बालकांच्या उंचीनुसार वजन कमी असलेल्या पाच वर्षांखालील बालकांचे प्रमाण

जयंत धुळप अलिबाग : राज्यात २०१६मध्ये १८ हजार बालमृत्यू झाले, असे सरकारी आकडेच सांगतात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस) २००५-२००६च्या तुलनेत २०१५-१६ मध्ये राज्यात बालकांच्या उंचीनुसार वजन कमी असलेल्या पाच वर्षांखालील बालकांचे प्रमाण ५.२ टक्क्यांवरून वाढून ९.४ टक्के म्हणजे, जवळपास दुप्पट झाल्याचे निष्पन्न झाले. कुपोषणाच्या या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर बालमृत्यू आणि कुपोषण या मुद्द्यांवर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयांनीही लक्ष घालून उपाययोजना सुचविल्या आहेत. भारतरत्न डॉ. एपीजे अब्दूल कलाम अमृत आहार योजना ही कुपोषण निर्मूलनाच्या दिशेने टाकलेले सकारात्म पाऊल असले तरी रायगड जिल्ह्यात आदिवासी बालकांच्या कुपोषणमुक्तीस जिल्ह्यातील रिक्त पदांचा मोठा अडसर निर्माण झाला आहे.रायगड जिल्हा परिषदेचा महिला व बाल कल्याण विभाग, आरोग्य विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील ३ हजार २८३ अंगणवाड्यांमध्ये आॅक्टोबर २०१७ अखेर ० ते ६ या वयोगटातील १ लाख ५९ हजार १९० बालके आहेत. त्यापैकी १ लाख ४६५८२ बालकांच्या वजनांच्या नोंदी घेण्यात आल्या, त्यात १ लाख ४५ हजार ४८१ बालके सर्वसाधारण दिसून आली. सप्टेंबर २०१७मध्ये मध्यम कुपोषित (मॅम) बालके ८४२ होती, त्यामध्ये वाढ होऊन आॅक्टोबर २०१७ अखेर ती ९०५ झाली आहेत. सुधारणा झालेली बालके केवळ ३.२ टक्के म्हणजे २९ आहेत. तीव्र कुपोषित (सॅम) बालके सप्टेंबर २०१७मध्ये १७५ होती त्यामध्ये वाढ होऊन, ती आॅक्टोबर २०१७ अखेर १९६ झाली आहेत. यामधील केवळ ९.१ टक्के म्हणजे १८ बालकांमध्ये सुधारणा होऊ शकली आहे.कुपोषण मुक्तीकरिता जिल्ह्यात गाव पातळीवर अपेक्षित ‘ग्राम बाल विकास केंद्रे’(व्हीसीडीसी) आणि प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय पातळीवर अपेक्षित ‘बाल उपचार केंद्रे’(सीटीसी) ही मुळातच अपुºया प्रमाणात आहेत. तर महिला बाल कल्याण विभागातील मंजूर १०८ पदांपैकी जिल्ह्यात १६ पदे रिक्त आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचे ‘उप मुख्य कार्यकारी अधिकारी’ हे कुपोषण मुक्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या जबाबदार अधिकाºयांचे पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. परिणामी, जिल्हा स्तरावरून करायच्या अपेक्षित अंमलबजावणी उपाययोजना होऊच शकत नाहीत.