रघुलीला मॉलमध्ये कोसळला स्लॅब
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 22:17 IST2018-07-24T22:16:55+5:302018-07-24T22:17:43+5:30

रघुलीला मॉलमध्ये कोसळला स्लॅब
नवी मुंबई - वाशीमधील रघुलिला मॉलमध्ये अंतर्सजावट केलेल पीओपी स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. आज दुपारी एकचा सुमारास घटना घडली. सुदैवान यात कोणती जीवितहानी झालेली नाही. वाशी येथे असलेल्या रघुलीला मॉलमध्ये आज दुपारी तिसऱ्या मजल्यावरिल संरक्षक ग्रील आणि त्याला लागुन असलेला पीओपी स्लॅब तळ मजल्यावर कोसळला. सुट्टीचा दिवस नसल्याने तसेच दुपारचा वेळी घटना घडल्याने सुदैवान कोणासही दुखापत झाली नाही. सध्या मॉल बंद ठेवण्यात आला असून डागडुजीच काम सुरु आहे .