शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या; राणी चांदबिबीच्या वंशजांचं आदित्य ठाकरेंना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 5:18 PM

Aditya Thackrey And Anisa Shaikh : सध्याच्या घडीला विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास न करता पर्यटनाला उभारणी देण्याची गरज असल्याचे मत अनिसा शेख यांनी व्यक्त केले आहे. 

पनवेल -जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहात साजरा केला जाणार आहे. मात्र सध्याच्या घडीला कोरोनामुळे सर्वच क्षेत्रातील घटकांना मोठा फटका बसला आहे. नोटबंदीनंतर अर्थव्यवस्थेला बसलेला फटका पुन्हा एकदा कोरोना अशा या दुहेरी संकटामुळे आघातामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात पर्यटनाच्या दृष्टीने विविध रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. याकरिता पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत गांभीर्याने विचार करण्याची मागणी स्पॅन महिला अ‍ॅग्रो टुरिजम संस्थेच्या अनिसा शेख यांनी केली आहे.

अनिसा शेख या अहमदनगरच्या राणी सुलतान चांदबीबी ज्यांनी महाराष्ट्रात मुघलांना प्रवेश रोखण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या वंशज आहेत. शेख यांच्या संस्थेत सुमारे 9 हजार महिला सभासद आहेत. नवी मुंबईमधील निसर्गाने संपदेने परिपूर्ण अशा खारघर हिलवर अनिसा शेख यांचा अ‍ॅग्रो टुरिझम प्रकल्प आहे. याठिकाणी वेगवगेळ्या प्रकारच्या वनस्पती, वृक्षलागवड तसेच निसर्गाच्या रक्षणासाठी शेख या प्रयत्न करीत आहेत. सध्याच्या घडीला विकासाच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास न करता पर्यटनाला उभारणी देण्याची गरज असल्याचे मत अनिसा शेख यांनी व्यक्त केले आहे. 

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्राच्या उभारणीसाठी राबविले जाणारे नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद आहेत. मात्र पर्यटन क्षेत्रावर देखील मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने महाराष्ट्रातील दुर्गम भागातील आदिवासी महिलांपासून शहरी भागातील सुशिक्षित महिलांनी देखील यामध्ये सहभागी करण्याची मागणी शेख यांनी केली आहे. जागतिक महिला दिन सप्ताह निमित्ताने विविध क्षेत्रातील कौतुकास्पद कामगिरी केलेल्या महिलांसाठी कार्यक्रम आयोजित करून त्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे शेख यांनी सांगितले. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेjobनोकरीMaharashtraमहाराष्ट्रWomenमहिला