मुसळधार पावसामुळे नवी मुंबईत संरक्षण भिंत कोसळली, तीन कारचे नुकसान
By नामदेव मोरे | Updated: June 28, 2023 13:44 IST2023-06-28T13:44:03+5:302023-06-28T13:44:19+5:30
दिघा ते ऐरोलीदरम्यान संपूर्ण नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे नवी मुंबईत संरक्षण भिंत कोसळली, तीन कारचे नुकसान
नवी मुंबई : नवी मुंबई महानगर पालिका कार्यक्षेत्रात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाने एनआरआय काँप्लेक्समधील संरक्षण भिंत कोसळून तीन कारचे नुकसान झाले आहे.
दिघा ते ऐरोलीदरम्यान संपूर्ण नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सकाळी कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांची व विद्यार्थ्यांसह पालकांचीही धावपळ उडाली. एनआरआय काँप्लेक्स मध्ये सोसायटीची संरक्षण भिंत कोसळली.
सुदैवाने यामध्ये कोणी जखमी झाले नाही. शहरात अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पावसामुळे भाजीपाल्याची आवकही घटली आहे.
नवी मुंबई : NRI कॉम्प्लेक्समध्ये भिंत पडून तीन गाड्यांचे नुकसान झाले.(व्हिडिओ संदेश रेणोसे)https://t.co/CbvSFUB0GJpic.twitter.com/rlF3PDeWBx
— Lokmat (@lokmat) June 28, 2023