शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

महिनाभरात ९८४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 12:27 AM

पोलीस यंत्रणा सज्ज, चार हजार पोलिसांसह एक हजार होमगार्ड तैनात

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात सोमवारी होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने चोख बंदोबस्त लावला आहे, तर मागील महिन्याभरात ९८४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या असून, त्यापैकी १७ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. सोमवारी होणाºया विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा शनिवारी संध्याकाळपासून थंडावल्या आहेत. त्यानुसार निवडणुकीच्या अंतिम टप्प्याच्या दोन दिवसांत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ऐरोली, बेलापूर, पनवेल व उरण हे चार विधानसभा क्षेत्र येतात. या चारही विधानसभा क्षेत्रात निर्भयपणे मतदानाची प्रक्रिया राबवली जावी, याकरिता पोलीस सज्ज झाले आहेत. त्याकरिता संपूर्ण आयुक्तालयात सुमारे चार हजार पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. त्याशिवाय इतर राखीव दलाच्या चार तुकड्या व एक हजार होमगार्ड नवी मुंबई पोलिसांच्या मदतीकरिता शहरात दाखल झाले आहेत. त्यानुसार विशेष शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्याकडून चारही मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे.

प्रचार थांबल्यानंतर शेवटच्या दोन दिवसांत मतदारांना प्रलोभने दाखवणे, मद्यपार्टी अथवा इतर गैरप्रकाराची शक्यता असते. त्याला आळा घालण्यासाठी चारही मतदारसंघात भरारी व स्थिर पथके तैनात करण्यात आली आहेत. सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात होणार असल्याने रविवारी सकाळीच सर्व मतदान केंद्रावर ईव्हीएम मशिन पोहोचवल्या जाणार आहेत. त्याकरिता प्रत्येक मतदारसंघात एक याप्रमाणे आयुक्तालय कार्यक्षेत्रात चार स्ट्राँगरूम तयार करण्यात आले आहेत. ऐरोलीतील सरस्वती विद्यालय, नेरुळचे आगरी कोळी भवन, पनवेलची इंदुबाई वाजेकर शाळा व उरणची जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी हे स्ट्राँगरूम तयार करण्यात आले आहेत.

मागील दोन दिवसांपासून या केंद्रांना पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे. मतदानानंतर मतमोजणीपर्यंत त्याच ठिकाणी ईव्हीएम मशिन ठेवल्या जाणार आहेत. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. सर्वच स्ट्राँगरूममध्ये तसेच बाहेरच्या आवारात सीसीटीव्हीचे जाळे बसवण्यात आले आहे. तर निवडणूक अधिकारी व बंदोबस्तावरील पोलीस यांच्याव्यतिरिक्त इतर व्यक्तींना सदर परिसरात प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

निवडणूक काळात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून मतदारावर दहशत निर्माण केली जाऊ शकते. अथवा मतदारांना प्रलोभने दाखवून त्यांचे मतपरिवर्तन केले जाऊ शकते. याकरिता मद्याचा अथवा पैशाचा वापर केला जाऊ शकतो. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक घोषित झाल्यापासून मागील महिन्याभरात परिमंडळ एकचे उपआयुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ९८४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी १७ जणांना निवडणुकीच्या अनुषंगाने तडीपार करण्यात आले आहे. ज्यांच्याकडून गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा ३५७ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

परिमंडळ-२ मध्ये ५०५ जणांवर कारवाई

परिमंडळ-२ चे उपआयुक्त अशोक दुघे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ५०५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये ज्यांच्यापासून गुन्हेगारी कृत्य घडू शकते, अशा ३०० जणांचा समावेश आहे. त्यांना पोलिसांकडून नोटिसा बजावून कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल, असे कृत्य करण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. तर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या २०५ जणांनाही नोटीस बजावून कारवाई करण्यात आली आहे.

घणसोलीतून रोकड जप्त

मतदारांना प्रलोभने दाखवण्यासाठी पैशाचा वापर होऊ नये, याकरिता निवडणूक विभागाच्या भरारी पथकामार्फत सापळे रचून कारवाया केल्या जात होत्या. त्यानुसार घणसोली येथून ११ लाख ७७ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. ही रोकड आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आली असून, त्या प्रकरणी चौकशी सुरू आहे. याशिवाय मुख्य रस्ते, नाक्यानाक्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मद्यविक्रीलाही बंदी

कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने शनिवार संध्याकाळपासून सोमवारी रात्रीपर्यंत बार, मद्यविक्री केंद्र तसेच चायनीस सेंटर बंद राहणार आहेत. त्याशिवाय अवैधरीत्या दारूसाठ्याचाही पुरवठा होणार नाही याचीही खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. त्यानुसार मागील महिन्याभरात अवैध दारूविक्रीचे सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच अनुषंगाने परिमंडळ एक मध्ये उपआयुक्तांच्या विशेष पथकाने मागील महिन्याभरात ३० हून अधिक कारवाई करून ४० जणांना अटक करण्यात आली आहे. तर हेरॉइन, एमडी पावडर यासह सुमारे २०५ किलो गांजाही पकडण्यात आला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Policeपोलिस