शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: January 9, 2016 02:15 IST

रायगड जिल्ह्यातील नवनिर्मित खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा व पोलादपूर या नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये ८२ जागांकरिता रिंगणात असलेल्या २४६

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील नवनिर्मित खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा व पोलादपूर या नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये ८२ जागांकरिता रिंगणात असलेल्या २४६ उमदेवारांच्या यशापयशापेक्षा जिल्ह्यात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते अनंत गीते, रायगडचे पालकमंत्री व भाजपा नेते प्रकाश मेहता,शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे, काँग्रेसचे प्रदेश चिटणीस माजी आमदार माणिकराव जगताप, शिवसेनेचे अ‍ॅड.राजू साबळे, शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले, भाजपा नेते प्रवीण दरेकर, भाजपा नेते कृष्णा कोबनाक,शिवसेना जिल्हा प्रमुख रवी मुंढे आदि प्रमुख राजकीय नेत्यांबरोबरच जिल्ह्यातील सर्व आमदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.पोलादपूर नगरपंचायतीत भाजपाच्या हाती सत्तेच्या चाव्या राहणार असल्याचा दावा रायगडचे पालकमंत्री व भाजपा नेते प्रकाश मेहता यांनी केला असला तरी त्यांना पोलादपूरचे शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले यांचे अत्यंत कडवे आव्हान आहे. काँग्रेसचे प्रदेश चिटणीस महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप हेही दंड थोपटून प्रचारात उतरले असून प्रचारात आघाडी घेतल्याचा दावा काँग्रेसजन करीत आहेत.माणगाव नगरपंचायत निवडणुकीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांचे स्नेही असणारे माजी आमदार अशोक साबळे व त्यांचे चिरंजीव अ‍ॅड.राजीव साबळे हे आता शिवसेनेतून पक्के विरोधात ठाकले आहेत. तटकरे व साबळेंनी एकमेकांना जाहीर आव्हान देखील दिले आहे. सेना-भाजपा युतीचे कडवे आव्हान राष्ट्रवादीला आहे. तळा नगरपंचायतीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीस सेना-भाजपाचे आव्हान आहे. म्हसळा नगरपंचायत ‘राष्ट्रवादी काँग्रेस मुक्त’करण्याचा चंग भाजपा नेते कृष्णा कोबनाक यांनी भाजपा-सेना-आरपीआय अशा युतीच्या माध्यमातून बांधला आहे. खालापूरमध्ये शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी लक्ष घातले असल्याने,येथील निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)