भाजपा सरकारविरोधात सर्वांनी एकत्र यावे, प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 11:41 PM2018-09-05T23:41:41+5:302018-09-05T23:42:04+5:30

भाजपा सरकारविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आली आहे. बहुजन समाजानेही भारिप महासंघाच्या झेंड्याखाली एकत्र येऊन भ्रष्टाचारी सरकारला सत्तेतून पायउतार करण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

Prakash Ambedkar's appeal to all to come together against BJP government | भाजपा सरकारविरोधात सर्वांनी एकत्र यावे, प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

भाजपा सरकारविरोधात सर्वांनी एकत्र यावे, प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

Next

नवी मुंबई : भाजपा सरकारविरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आली आहे. बहुजन समाजानेही भारिप महासंघाच्या झेंड्याखाली एकत्र येऊन भ्रष्टाचारी सरकारला सत्तेतून पायउतार करण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावरही टीका करून आमच्या विचारांचे सरकार आल्यावर त्यांना तुरुंगात पाठविण्याचा इशारा दिला.
वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात भारतीय बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यास प्रचंड गर्दी जमल्यामुळे हजारो कार्यकर्ते नाट्यगृहाबाहेर सभा संपेपर्यंत उभे होते. प्रकाश आंबेडकर यांनी धर्माचे राज्य आणि संकल्पनेमध्ये अडकून राहू नका. सत्तेवर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे सरकार फसवे आहे. लुटारूंचे आणि भ्रष्टाचारी सरकार आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत बँकांचे करोडो रुपयांची कर्जे काढून परदेशात पळून जाणाऱ्या दरोडेखोरांची हे सरकार पाठराखण करीत असल्याची घणाघाती टीका आंबेडकर यांनी या वेळी केली. राफेल विमान खरेदी प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला असून त्याचीही चौकशी झाली पाहिजे, असे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावर टीका केली. आमच्या विचारांचे सरकार सत्तेवर आल्यावर सर्वप्रथम रामदास आठवले यांना तुरुंगात पाठविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नोटाबदलीचा निर्णय कोणत्या कॅबिनेटमध्ये झालाय, हे त्यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला सांगितले पाहिजे. त्यामुळे अधिकार नरेंद्र मोदींना हा अधिकार कुणी दिला. असाही सवाल त्यांनी केला. संभाजी भिडे गुरुजी, शरद पवार, महादेव जानकर, रामदास आठवले, उद्योगपती मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यावर सडकून टीका केली. विचारवंत लक्ष्मण माने, माजी आमदार हरिभाऊ भदे, अमोल पांढरे, बापूसाहेब वाटकर, बहुजन वंचित आघाडीचे संघटक महादेव अर्जुन, भारिप बहुजन महासंघाचे हणमंत वाकशे, अरुण गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे खाजा मियाँ पटेल आदी उपस्थित होते.

Web Title: Prakash Ambedkar's appeal to all to come together against BJP government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.