उरणमधील प्रभाकर ठाकूर थायलंड मॅरेथॉनमध्ये धावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 00:05 IST2019-03-06T00:05:10+5:302019-03-06T00:05:19+5:30
नागाव मांडळ आळी येथील ७४ वर्षांचे चिरतरुण प्रभाकर दामोदर ठाकूर, हे येत्या शुक्रवारी थायलंड येथील मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत.

उरणमधील प्रभाकर ठाकूर थायलंड मॅरेथॉनमध्ये धावणार
उरण : तालुक्यातील नागाव मांडळ आळी येथील ७४ वर्षांचे चिरतरुण प्रभाकर दामोदर ठाकूर, हे येत्या शुक्रवारी थायलंड येथील मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. त्यासाठी त्यांचा जोरदार सराव सुरू आहे. भारतात तसेच परदेशात ठाकूर यांनी स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन अनेक पदके मिळवली आहेत. २००७ मध्ये मलेशियात येथे आयोजित मॅरेथॉनमध्ये त्यांनी पदक पटकावले आहे. न्यूझिलंडमध्येही २०१७ मध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये त्यांनी पारितोषिके पटकावली आहेत. यामध्ये १० हजार मीटर, पाच हजार मीटर, १,५०० मीटर , ४०० मीटर, १०० मीटर आदी स्पर्धांचा समावेश आहे.
इंडिया मास्टर्स अॅथॅलेटिकने दिलेल्या पत्रानुसार, गुरुवार, ७ मार्च रोजी प्रभाकर ठाकूर हे थायलंड येथे जाणार असून तेथे दहा किमी, पाच किमी, दीड किमी, ८०० मीटर, ४०० मीटर आदी स्पर्धेत भाग घेणार आहेत.