एसपीव्हीएसच्या सूत्रधारांच्या मागावर पोलिस, दामदुप्पट प्रकरण; दलालांभवती कारवाईचा आवळणार फास

By सूर्यकांत वाघमारे | Published: February 26, 2024 07:34 PM2024-02-26T19:34:36+5:302024-02-26T19:34:56+5:30

फॉरेक्स ट्रेडिंगचा बहाण्याने कोट्यवधींची बेकायदेशीर गुंतवणूक करून घेणाऱ्या एसपीव्हीएस कंपनीच्या प्रमुखांच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. याप्रकरणी दोन दलालांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून इतरही दलालांची माहिती समोर आली आहे.

Police on trail of SPVS masterminds, double case; The noose of illegal action will be opened | एसपीव्हीएसच्या सूत्रधारांच्या मागावर पोलिस, दामदुप्पट प्रकरण; दलालांभवती कारवाईचा आवळणार फास

एसपीव्हीएसच्या सूत्रधारांच्या मागावर पोलिस, दामदुप्पट प्रकरण; दलालांभवती कारवाईचा आवळणार फास

नवी मुंबई : फॉरेक्स ट्रेडिंगचा बहाण्याने कोट्यवधींची बेकायदेशीर गुंतवणूक करून घेणाऱ्या एसपीव्हीएस कंपनीच्या प्रमुखांच्या शोधासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. याप्रकरणी दोन दलालांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून इतरही दलालांची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या सर्वांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार असून काहींनी कारवाईच्या भीतीने शहरातून पळ देखील काढला आहे.

वर्षभरात दामदुप्पट करून देण्याच्या बहाण्याने गुंतवणूकदारांकडून पैसे उकळणाऱ्या कंपनीवर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नवी मुंबई पोलिसांच्या फायनान्शिअल इंटेलिजन्स विभागाच्या पथकाने प्राप्त तक्रारींवरून ही कारवाई केली आहे. यामध्ये भगवान कोंढाळकर व सागर बोराटे यांना घणसोलीतुन अटक केल्यानंतर त्यांचे संगणक व मोबाईल यामधून कंपनीचे सूत्रधार तसेच इतरही दलाल यांच्याबद्दलची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यात गुंतवणूकदारांच्या रकमेचाही आकडा समोर आला असून तो कोट्यवधींच्या घरात असल्याचे समजते. त्याद्वारे कंपनीचे प्रमुख सचिन डोंगरे व विकास निकम यांच्याही शोधात आर्थिक गुन्हे शाखा पोलिस गुंतले आहेत. त्याशिवाय गुंतवणूकदारांनाही संपर्क साधून तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन पोलिसांमार्फत सुरु आहे.

या तक्रारदारांना पोलिसांपर्यंत जाण्यापासून थांबवण्यासाठी डोंगरे, निकम यांच्यासह त्यांच्या संपर्कातील दलाल प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ठराविक तारखेपर्यंत पैसे दिले जातील अशा आश्वासनांचा वर्षाव सुरु आहे. दरम्यान दोन्ही सूत्रधार दुबईत असल्याच्या चर्चा गुंतवणूकदारांमध्ये असल्या तरीही ते काही मध्यस्थींमार्फत कॉन्फरन्स कॉवरून थेट गुंतवणूकदारांना संपर्क साधत आहेत. एसपीव्हीएसची सर्व बँक खाती व त्या खात्यातून ज्या खात्यांमध्ये मोठी रक्कम गेलेली आहे अशी सर्व बँक खाती पोलिसांमार्फत गोठवण्याचे काम सुरु आहे. 

Web Title: Police on trail of SPVS masterminds, double case; The noose of illegal action will be opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.