शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ठरावीक कालावधीतील गुन्ह्यांमुळे पोलीस संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 03:22 IST

पॉक्सो प्रकरण : जून ते सप्टेंबरमधील गुन्हे

सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : पॉक्सोच्या १५ गुन्ह्यांत अटकेत असलेल्या रेहान कुरेशीने जून ते सप्टेंबर या महिन्यांतच गुन्हे केल्याचे समोर आले आहे. तीनही वर्षातील याच महिन्यांत त्याने केलेले गुन्हे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहेत; परंतु तो सराईत गुन्हेगार असल्याने सतत चुकीची माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करत असल्याने अशा अनेक बाबींचा उलगडा करण्याचे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

नवी मुंबईसह मुंबई, ठाणे ग्रामीण व ठाणे शहर, तसेच पालघर परिसरातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना मागील तीन वर्षांपासून घडत होत्या; परंतु चारही आयुक्तालयाच्या पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाही तो हाती लागत नव्हता. सीसीटीव्ही व्यतिरिक्त त्याचा कसलाही ठोस पुरावा नसल्याने त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांची दमछाक झाली होती. अखेर नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा पोलिसांनी शिताफीने मीरारोड येथून त्याला अटक केली. चौकशीत त्याने १५ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यात २०१६ मध्ये त्याने मुंबईच्या भोईवाडा, तसेच ठाण्याच्या नवघर परिसरात गुन्हे केल्याचे समोर आले आहे.२३ जानेवारी २०१५ मध्ये तळोजा येथेही त्याच्यावर पॉक्सोचा पहिला गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर त्याने हे तीनही गुन्हे केल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर नवी मुंबई, ठाणे व पालघर परिसरात अल्पवयीन मुलींवर पाळत ठेवून त्यांच्यावर अतिप्रसंग केले आहेत. काही मुलींनी धाडसाने त्याच्यापासून स्वत:ची सुटकादेखील करून घेतली होती. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात पॉक्सोचे गुन्हे दाखल आहेत.रेहानच्या चौकशीसाठी आयुक्त व उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नेमण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त अजय कदम हे त्या पथकाचे प्रमुख असून, गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक आनंद चव्हाण, उपनिरीक्षक ज्योती सूर्यवंशी, जगदीश पाटील व इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.च्रेहानवर दाखल असलेले दोन गुन्हे वगळता इतर सर्व गुन्हे जून ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीतील आहेत.च्केवळ २०१७ व १८ मध्ये एप्रिल महिन्यात प्रत्येकी एक गुन्हा आहे. याव्यतिरिक्त त्याच्यावर २०१६ मध्ये ३, २०१७ मध्ये ४ तर २०१८ मध्ये ५ गुन्हे दाखल असून त्याची कबुलीही त्याने दिलेली आहे. इतरही गुन्हे त्याने केल्याची शक्यता असून पोलीस त्याचा तपास करत आहेत. मात्र, समोर आलेले गुन्हे जून ते सप्टेंबर महिन्यांतच का केले? असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामागे काही ठोस कारण आहे का की निव्वळ योगायोग, याचाही उलगडा पोलिसांना करावा लागणार आहे. तो सतत चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत असल्याने पोलिसांपुढे तपासाचे आव्हान वाढले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी