सीवूड ग्रँड सेंट्रल मॉल परिसरात नो पार्कीग झोनमधील 122 वाहनांवर दंडात्मक कारवाई

By नारायण जाधव | Updated: September 17, 2022 14:56 IST2022-09-17T14:55:56+5:302022-09-17T14:56:30+5:30

"नो पार्किंग झोनमध्ये उभ्या असलेल्या व रस्ते/पदपथावर अडथळा निर्माण करीत असलेल्या 122 वाहनांवर दंडात्मक कारवाई."

Penal action against 122 vehicles in no parking zone in Seawood Grand Central Mall area | सीवूड ग्रँड सेंट्रल मॉल परिसरात नो पार्कीग झोनमधील 122 वाहनांवर दंडात्मक कारवाई

सीवूड ग्रँड सेंट्रल मॉल परिसरात नो पार्कीग झोनमधील 122 वाहनांवर दंडात्मक कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका ए विभाग कार्यालय बेलापूर यांच्या वतीने विभाग कार्यालय क्षेत्रातील सीवूड ग्रँड सेंट्रल मॉल परिसरातील सेक्टर 40  व सेक्टर 42, नेरूळ येथे एनआरआय सागरी पोलिस व वाहतूक पोलीस यांच्या सहयोगाने संयुक्त मोहीम राबवून नो पार्किंग झोनमध्ये उभ्या असलेल्या व रस्ते/पदपथावर अडथळा निर्माण करीत असलेल्या 122 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. 

बेलापूर विभागाच्या सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी मिताली संचेती, एनआरआय सागरी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील तसेच पृथ्वीराज घोरपडे व गायमुख वाहतूक पोलीस ठाणे मधील सहा. पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत, बेलापूर विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली. यापुढेही  वाहतुक शिस्त आणि नियंत्रणाच्या दृष्टीने अशा प्रकारची कारवाई राबविण्यात येणार आहे.
 

Web Title: Penal action against 122 vehicles in no parking zone in Seawood Grand Central Mall area