शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
5
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
6
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
7
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
8
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
9
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
10
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
11
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
12
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
13
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
14
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
15
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
16
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
17
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
18
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
19
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
20
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील फेरीवाल्यांच्या हाती दमडीही पडली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 00:36 IST

घोषणा केल्याने मदतीची प्रतीक्षा : १५ हजार नोंदणीकृत फेरीवाले

योगेश पिंगळे

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी घोषित करताना राज्य सरकारने फेरीवाल्यांना प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याचे घोषित केले होते. सुमारे वीस दिवसांचा कालावधी उलटला असताना नवी मुंबई शहरातील फेरीवाल्यांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. याबाबत महापालिकेला देखील काही ठोस सूचना मिळालेल्या नसून शहरातील सुमारे १५ हजार नोंदणीकृत फेरीवाले मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

कोरोना  झपाट्याने वाढू लागल्याने १३ एप्रिल रोजी निर्बंध अधिक कठोर करण्याची घोषणा करण्यात आली होती. याकाळात फेरीवाले, रिक्षा चालक आदींना दिलासा म्हणून राज्यशासन प्रत्येक नोंदणीकृत फेरीवाल्यांना दीड हजार रुपये मदत करणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु घोषणा करून सुमारे २० दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप मदत न मिळाल्याने फेरीवाले नाराजी व्यक्त करत आहेत. शहरात साधारण १५ हजार नोंदणीकृत फेरीवाले असून नोंदणी नसणाऱ्या फेरीवाल्यांची संख्या सुमारे १० हजार इतकी आहे.

मागील वर्षी घेण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर पथविक्रेत्यांना पुन्हा व्यवसाय सुरु करण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून '' पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी '' योजना राबविण्यात आली होती. या योजनेत पथविक्रेत्याला एक वर्षाच्या परतफेड मदतीसह १० हजार रुपयांपर्यंतचे खेळते भांडवल कर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नवी मुंबई शहरातून सुमारे १५ हजार फेरीवाल्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते. त्यामधील सुमारे चार हजार पथविक्रेत्यांना या योजनेची मदत मिळाली होती. विविध कारणांनी प्रलंबित राहिलेल्या तसेच कालांतराने काही फेरीवाल्यांनी कर्जास नकार दिला. तसेच काहींच्या कर्जाची प्रक्रिया अद्याप सुरुच आहे. आता राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या दीड हजार रुपयांच्या मदतीच्या प्रतीक्षेत फेरीवाले आहे. 

नोंदणीकृत फेरीवाल्यांची माहिती महापालिकेकडून शासनाला देण्यात आली आहे. शासनाकडून फेरीवाल्यांना देण्यात येणाऱ्या मदतीचा निधी दीनदयाळ अंत्योदय योजना कार्यालयाकडे जमा झाला आहे. निधी त्यांच्याकडून महापालिकेकडे वर्ग केला जाईल तसेच याबाबत गाईडलाईन देखील दिल्या जातील. त्यानंतर फेरीवाल्यांना मदत निधीचे ऑनलाईन पद्धतीने वाटप केले जाणार आहे.- श्रीराम पवार (उपायुक्त, परवाना विभाग, न.मुं.म.पा)

फेरीवाले काय म्हणतात

शासनाकडून फेरीवाल्यांना मिळणाऱ्या मदतीबाबत महापालिकेच्या विभाग कार्यालयात चौकशी केली होती. परंतु त्यांच्याकडे याबाबत काही माहिती आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.                -गोपाल सिंह (फेरीवाला)-----

संचारबंदीमुळे व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. शासनाने दीड हजार रुपये मदत करण्याची घोषणा केली होती परंतु मदत अद्याप मिळालेली नाही. शासनाने लवकरात लवकर मदत द्यावी.-महादेव शिंदे (फेरीवाला)

शासनाने जाहीर केलेल्या मदतीमुळे थोडाफार दिलासा मिळाला होता. परंतु अद्याप प्रत्यक्षात मदत मिळालेली नाही. मदत कधी मिळणार याबाबत देखील अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही.- संजय देवळे (फेरीवाला)

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या