शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडीमुळे पनवेलकर हैराण

By admin | Updated: September 15, 2015 23:36 IST

पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक शहरात खरेदीसाठी येत असल्याने बाजार परिसरात मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे मंगळवारी शहरातील सर्व रस्ते जॅम झाले होते.

कळंबोली : पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक शहरात खरेदीसाठी येत असल्याने बाजार परिसरात मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे मंगळवारी शहरातील सर्व रस्ते जॅम झाले होते. कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांची वर्दळ यामुळे मुंबई- गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. शिवशंभो नाका ते ओएनसीजी कॉलनीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.कोकणवासीय आपल्या मूळ गावी खाजगी वाहने, बसने रवाना होत आहेत. एकाचवेळी वाहनांची वर्दळ वाढल्याने त्याचबरोबर तक्का ते पळस्पे फाटा दरम्यान रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. मंगळवारी ही तीव्रता अधिक असल्याने लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पनवेल मार्केटमध्ये गणेशभक्त खरेदीकरिता आपली वाहने घेवून येत असल्याने सकाळपासून शहरात चक्का जॅम होते. कापडबाजार, त्याचबरोबर पेढ्या गर्दीने फुलून गेल्या होत्या. याशिवाय टपाल नाका आणि उरण नाक्यावर वाहनांची मोठी वर्दळ होती. आंबेडकर मार्ग, महात्मा गांधी रोड, शिवाजी रोडवर चक्का जॅम होतो. महामार्गावर बंदोबस्तावर असलेल्या पनवेल शहर वाहतूक पोलिसांचे शहरात मात्र काही प्रमाणात दुर्लक्ष झाले. (वार्ताहर)