वाहतूक कोंडीमुळे पनवेलकर हैराण
By Admin | Updated: September 15, 2015 23:36 IST2015-09-15T23:36:41+5:302015-09-15T23:36:41+5:30
पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक शहरात खरेदीसाठी येत असल्याने बाजार परिसरात मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे मंगळवारी शहरातील सर्व रस्ते जॅम झाले होते.

वाहतूक कोंडीमुळे पनवेलकर हैराण
कळंबोली : पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक शहरात खरेदीसाठी येत असल्याने बाजार परिसरात मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे मंगळवारी शहरातील सर्व रस्ते जॅम झाले होते. कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांची वर्दळ यामुळे मुंबई- गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. शिवशंभो नाका ते ओएनसीजी कॉलनीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
कोकणवासीय आपल्या मूळ गावी खाजगी वाहने, बसने रवाना होत आहेत. एकाचवेळी वाहनांची वर्दळ वाढल्याने त्याचबरोबर तक्का ते पळस्पे फाटा दरम्यान रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. मंगळवारी ही तीव्रता अधिक असल्याने लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
पनवेल मार्केटमध्ये गणेशभक्त खरेदीकरिता आपली वाहने घेवून येत असल्याने सकाळपासून शहरात चक्का जॅम होते. कापडबाजार, त्याचबरोबर पेढ्या गर्दीने फुलून गेल्या होत्या. याशिवाय टपाल नाका आणि उरण नाक्यावर वाहनांची मोठी वर्दळ होती. आंबेडकर मार्ग, महात्मा गांधी रोड, शिवाजी रोडवर चक्का जॅम होतो. महामार्गावर बंदोबस्तावर असलेल्या पनवेल शहर वाहतूक पोलिसांचे शहरात मात्र काही प्रमाणात दुर्लक्ष झाले. (वार्ताहर)