शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

पनवेल महानगरपालिका : ९४३ कोटींच्या अर्थसंकल्पाला महासभेची मंजुरी, २९ गावांच्या पायाभूत विकासावरही भर देणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 11:13 AM

पाणीपुरवठा योजना, रस्ते, सुसज्य अग्निशमन सेवा, पनवेल महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेला २९ गावांचा पायाभूत विकास, तसेच विकासासाठी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या नवीन प्रकल्पांचा समावेश या अंदाजपत्रकामध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे.

वैभव गायकर

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या सन २०१९-२०चा सुधारित व २०२०-२१चा मूळ अशा ९४३ कोटींच्या अर्थसंकल्पाला गुरुवारी पार पडलेल्या विशेष महासभेत मंजुरी मिळाली. स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांनी हा अर्थसंकल्प महासभेत मांडला.पाणीपुरवठा योजना, रस्ते, सुसज्य अग्निशमन सेवा, पनवेल महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेला २९ गावांचा पायाभूत विकास, तसेच विकासासाठी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या नवीन प्रकल्पांचा समावेश या अंदाजपत्रकामध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर दिव्यांग कल्याण, महिला व बालविकास, मागावर्गीय घटक, अल्पसंख्यांक घटक आणि क्रीडा व सांस्कृतिकविषयक बाबींसाठी शासन धोरणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेने करावयाची अपेक्षित तरतूद सदर अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. महानगरपालिकेच्या कार्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या जागेची कमतरता भरून काढण्यासाठी सिडकोकडून पनवेल पालिकेच्या नव्या कार्यालयासाठी भूखंड उपलब्ध करून घेऊन, त्या ठिकाणी कार्यालये व प्रभाग कार्यालये बांधण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे, तसेच सिडको प्राधिकरणाकडून पनवेल महानगरपालिकेस हस्तांतरित होणाऱ्या भूखंडासाठी पुरेशी तरतूद करण्यात आलेली आहे.सन २०१९-२०२०च्या सुधारित अंदाजपत्रकात चालू वित्तीय वर्षातील प्रथम आठ महिन्यांतील (नोव्हेंबर, २०१९पर्यंत) प्रत्यक्ष जमा-खर्च व पुढील ४ महिन्यांत होणारा अपेक्षित जमा-खर्च विचारात घेण्यात आलेले आहेत. पनवेल महापालिकेस प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाच्या प्रमाणात होणारा खर्च मर्यादित ठेवणे अपेक्षित असल्यामुळे, त्या अनुषंगाने सुधारित खर्चाची मर्यादा प्रस्तावित करण्यात येत आहे.सन २०२०-२१च्या मूळ अर्थसंकल्पात सुरुवातीच्या शिलकेसह ९४५  कोटी उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले असून, रुपये ९४३.४२ कोटी खर्च अपेक्षित आहे.

अर्थसंकल्पातील ठळक बाबी -मालमत्ता व इतर कर - २०५ कोटी, वस्तू व सेवा कर अनुदान - १३० कोटी, १% मुद्रांक शुल्क अनुदान - ६९ कोटी, अमृत/नगरोत्थान योजनेंतर्गत अनुदान - ९७ कोटी, (पाणीपुरवठा व मलनि:सारण), विकास शुल्क व फायर प्रीमिअम - ४० कोटी, सहायक अनुदान - ३० कोटी, ठेवींवरील व्याज - १५ कोटी, स्वच्छ भारत अभियान अनुदान - १० कोटी, कोविड -१९ अनुदान - १५ कोटी.

पनवेलचा सर्वांगीण विकास समोर ठेऊन अर्थसंकल्पात विविध तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. सदर अंदाजपत्रक सादर करताना, अनेक सकारात्मक योजना, तरतुदी यावर स्थायी समिती सदस्यांची सखोल चर्चा झाली. पनवेल महानगरपालिकेच्या विकासाकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांचे मार्गदर्शन असणार आहे.  त्याचबरोबर, आपल्या सर्वांचे सहकार्य, तसेच मार्गदर्शन मिळेल, अशी आशा आहे.- प्रवीण पाटील, स्थायी समिती सभापती, पनवेल महानगरपालिका

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या बाबी  - छत्रपती संभाजी महाराज मैदान     विकसित करणे- पावसाळी जलनि:सारणाची     २२ कोटींची कामे- स्मार्ट व्हिलेज योजना नवीन ७ गावे- स्मशानभूमींचा विकास- बगीच्यांचा विकास- रस्त्यांचे काँक्रिटीकरण नवीन ७ किमी- २,३०० घरांची पंतप्रधान आवास योजना- स्वराज्य झ्र नवीन मुख्यालय इमारत                 बांधकाम- प्रभाग कार्यालये बांधकाम झ्र खारघर,    कळंबोली, कामोठे- भाजीमार्केट अंतिम भूखंड क्रमांक    १९३चे बांधकाम- मालमत्ता कराचे संगणकीकरण- विकास योजना पूर्णत्वास नेणे- डेली बाजाराचे बांधकाम- अमृत पाणीपुरवठा योजना- कोपरा व जुई तलावाचे सुशोभीकरण 

टॅग्स :panvelपनवेलNavi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगड