पनवेलमध्ये शवविच्छेदकाला मारहाण; रुग्णवाहिकाचालकासह चौघांविरोधात तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 00:45 IST2019-12-14T00:44:45+5:302019-12-14T00:45:14+5:30
पनवेल : पनवेल उपजिल्हा रु ग्णालयात शवविच्छेदन गृहात शवविच्छेदक म्हणून काम करणाऱ्या जयेश देशमुख (४२) याला येथील रुग्णवाहिकाचालकाने मारहाण ...

पनवेलमध्ये शवविच्छेदकाला मारहाण; रुग्णवाहिकाचालकासह चौघांविरोधात तक्रार
पनवेल : पनवेल उपजिल्हा रु ग्णालयात शवविच्छेदन गृहात शवविच्छेदक म्हणून काम करणाऱ्या जयेश देशमुख (४२) याला येथील रुग्णवाहिकाचालकाने मारहाण केल्याची घटना गुरु वारी रात्री ११.३० च्या सुमारास घडली. यासंदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असली, तरी शुक्रवारी सायंकाळपर्यंत कोणाही विरोधात गुन्हा दाखल झाला नव्हता.
उपजिल्हा रु ग्णालयात जात असताना अचानकपणे येथे रु ग्णवाहिकेवर काम करणाऱ्या विजय जाधवने तीन साथीदारांसह अचानकपणे उपजिल्हा रु ग्णालयाच्या आवारातच मारहाण केल्याचा आरोप जयेश देशमुखने केला आहे. या मारहाणीत जयेशच्या डोक्याला, पायाला, तसेच कानाला दुखापत झाली आहे. यासंदर्भात शुक्र वारी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. उपजिल्हा रु ग्णालयातील अधीक्षक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनीदेखील संबंधित घटनेला दुजोरा देत यासंदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्याला माहिती दिली असल्याचे सांगितले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.