शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलच्या उपमहापौरांची आॅडिओ क्लिप व्हायरल, उद्विग्नता व्यक्त करीत पालिकेवर नाराजीचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 00:15 IST

या प्रतिक्रियेची आॅडिओ क्लिप व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर मोठ्या प्रमाणात ही क्लिप झळकत असताना, तिच्या सत्यतेबाबत उपमहापौर जगदीश गायकवाड यांना विचारणा केली असता, त्यांनी संबंधित क्लिप माझीच असल्याचे सांगत, पालिका प्रशासनावर उघडपणे नाराजी व्यक्त केली.

पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांची आॅडिओ क्लिप सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लॉकडाऊन, तसेच पालिका प्रशासनाच्या कोविड नियंत्रणावर पालिकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या उपाययोजनांबाबत उपमहापौर जगदीश गायकवाड यांना एका वृत्त वाहिनीच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रियेबाबत विचारणा केली असता; गायकवाड यांनी आपली उद्विग्नता व्यक्त करीत पालिकेच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली.क्लिपमध्ये उपमहापौरांनी आपल्या भावना व्यक्त करीत पालिका प्रशासनाचे धिंडवडे काढत, लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याचे सांगत, पालिका प्रशासनामार्फत योग्य उपाययोजना राबविल्या जात नसल्याचा आरोप केला. यावेळी गायकवाड यांनी अत्यंत उद्विग्न भाषेत आपली नाराजी व्यक्त केली. या प्रतिक्रियेची आॅडिओ क्लिप व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर मोठ्या प्रमाणात ही क्लिप झळकत असताना, तिच्या सत्यतेबाबत उपमहापौर जगदीश गायकवाड यांना विचारणा केली असता, त्यांनी संबंधित क्लिप माझीच असल्याचे सांगत, पालिका प्रशासनावर उघडपणे नाराजी व्यक्त केली. सध्याच्या घडीला कोविड रुग्णांचे मोठे हाल सुरू आहेत. पनवेलकर मरत आहेत. चाचणीच्या नावाखाली लॅबकडून लोकांची लूट सुरू आहे. रुग्णालयात इतर उपचारासाठी जाणारे नागरिक कोरोनाने बाधित होत आहेत. पालिकेचा उपमहापौर या नात्याने आम्हाला अनेक रुग्णांचे, नातेवाइकांचे फोन येत आहेत. पालिका प्रशासनावर उघडपणे नाराजी व्यक्त करीत असून, लोकप्रतिनिधी या नात्याने आम्हालाही नागरिक दोष देत आहेत. त्यामुळे उद्विग्नपणे मी माझ्या भावना व्यक्त केल्या.खासगी रुग्णालयामार्फत केवळ रोख पैसे देणाºया कोविड रुग्णांनाच उपचार दिले जात आहेत. इन्शुरन्स पॉलिसी असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ केली जात आहे. पनवेल महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. जगदीश गायकवाड हे भाजपाचे उपमहापौर आहेत.या क्लिपमध्ये उपमहापौरांनी वापरलेल्या भाषेबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पालिका प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर असला, तरी ज्या भाषेचा वापर केला आहे, त्या भाषेचे समर्थन करता येणार नसल्याचे पनवेलकरांचे म्हणणेआहे.

टॅग्स :panvelपनवेलcorona virusकोरोना वायरस बातम्या