शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

पनवेल बनतेय एज्युकेशन हब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:36 IST

उत्तम शैक्षणिक दर्जा आणि सोयी-सुविधांमुळे पनवेलच्या शाळा - कॉलेजांना आज वेगळी ओळख मिळाली आहे.

शहरातील बाजारपेठ, चाकजोड निर्मिती केंद्र, औषधांचे कारखाने, बंदर ही पनवेलची जुनी ओळख आहेच. मात्र शैक्षणिक क्षेत्रातही पनवेल मागे राहिले नाही. उत्तम शैक्षणिक दर्जा आणि सोयी-सुविधांमुळे पनवेलच्या शाळा - कॉलेजांना आज वेगळी ओळख मिळाली आहे. आज याकडे शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते.मुंबई आणि पुणे या दोन महानगरांच्या मध्यभागी पनवेल असल्याने पनवेलचा चौफेर बदल अनुभवयाला मिळतोय. त्यातल्या त्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे हे महानगर जगाच्या नकाशावर अधोरेखित होत आहे. त्यात पनवेलमधील सिडको वसाहती स्मार्ट करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे. याच कारणाने पनवेल परिसरात खासगी शिक्षण संस्थांनी या परिसरात शैक्षणिक संकुल सुरू केले. वास्तविक पाहता पनवेलचा शैक्षणिक स्तर कायम वर राहिला आहे. रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल महानगरपालिका शाळांबरोबरच कोकण आणि सुधागड एज्युकेशनचे योगदान खूप मोठे आहे. गेल्या काही वर्षात पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे परिसरात खासगी शिक्षण संस्था आल्या आहेत. त्यातल्या त्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्याही वाढली आहे. सेंट जोसेफ, कारमेल, महात्मा स्कूल, डी.ए. व्ही पब्लिकस्कूल, बालभारती या शाळांमध्ये प्रवेश घेण्याकरिता पालकांची चढाओढ लागते. नर्सरीच्या अ‍ॅडमिशनसाठी थेट मंत्रालयातून फिल्डिंग लावली जाते. म्हणजे या शाळांना किती महत्त्व प्राप्त झाले आहे याची प्रचिती येते.पूर्वी शिक्षण म्हटले की चटकण पुणे हे नाव तोंडात यायचं याचे कारण हे शहर शिक्षणाचे माहेरघर आणि राज्याची शैक्षणिक राजधानी आहे. मात्र आता त्याच तोडीचे एज्युकेशन म्हणून खारघरचे नाव पुढे आले. सायबर सिटी म्हणून या शहराचे नाव आहेच, आता शिक्षण संस्था येथे एकटवल्या असल्याने वेगळे ग्लॅमर आले आहे. भारती विद्यापीठ, एस.सी. पाटील, जी. डी. पोळ, आयटीएम, सरस्वती यासारखे महत्त्वाचे कॉलेज खारघरमध्ये आहेत. येथे देशभरातून विद्यार्थी शिकायला येत आहेत. तसेच या शहरात फॅशन डिझाइनचे कॉलेज आहे. याशिवाय दर्जेदार माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा या सिटीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. वैद्यकीय, अभियांत्रिकी, मॅनेजमेंट , नर्सिंग, आर्किटेक्चरचे शिक्षण येथे मिळते. लाखो विद्यार्थी या अभ्यासक्रमाचे धडे घेत आहेत. याशिवाय सी.के.टी., पिल्लाई, एमजीएम ही महाविद्यालये अनुक्रमे खांदा वसाहतीत आहेत. विसपुते शैक्षणिक संकुलात विविध कोर्सेस आहेत, त्याचबरोबर एस.पी. मोरे महाविद्यालयात हॉटेल मॅनजमेंट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. आता एज्युकेशनचे वारे थेट पळस्पे, शिरढोणपर्यंत पोहचलेय येथे शिवाजी महाराज विद्यापीठ सुरू झाले आहे.पळस्पे येथे सर्वात अगोदर बालाजी न्यू इंग्लिश स्कूल सुरू झाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी चांगली इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाल्याने आजूबाजूची मुले येवू लागली त्यांच्यासाठी चांगली सुविधा निर्माण झाली. आता या पट्ट्यात डीपीएस, एमएनआर या शाळा आल्या. भविष्यात या भागात आणखी शिक्षण संस्था येतील याचे कारण पळस्पे भविष्यात मोठे जंक्शन होवू पाहतेय. शेंडूगला वेलफ्रेड कॉलेज तसेच स्कूल गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.एकंदरीतच पनवेलला विमानतळ, नैना, पुष्पकनगर आले असल्याने त्यामुळे गृहनिर्मिती वाढली, पर्यायाने शैक्षणिक संस्था वाढल्या त्यामुळे विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे या महानगराऐवजी येथेच शिक्षणाचे अनेक पर्याय मिळाले. म्हणून पनवेल एज्युकेशन हब बनतेय.

टॅग्स :Educationशिक्षणcollegeमहाविद्यालयSchoolशाळाpanvelपनवेल