शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

पनवेलमध्ये पावसाचा २९ वर्षांतील विक्रम मोडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 11:44 PM

रायगड कोकणमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. पनवेल तालुक्यातही विक्र मी पावसाची नोंद करण्यात आली आहे

वैभव गायकरपनवेल : रायगड कोकणमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. पनवेल तालुक्यातही विक्र मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील मुसळधार पावसामुळे मागील २० वर्षांपूर्वीच्या पावसाचा रेकॉर्ड तुटला आहे. यावर्षी पनवेलमध्ये ४७४३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. २६ जुलै २००५ मध्ये पनवेलमध्ये ३६४२ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. विशेष म्हणजे, यापूर्वी १९९० मध्ये ४२२२.८० मि.मी. पावसाची नोंद होती.पनवेल शहरात एक नव्हे तर तब्बल चार वेळा पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या पाहावयास मिळाल्या. पनवेलच्या ग्रामीण भागालाही या पावसाचा मोठा फटका बसला. या पूरसदृश स्थितीमुळे अनेकांचे नुकसान झाले. त्यामुळे ३५० पेक्षा जास्त कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले. काही जनावरेही या पावसामुळे दगावली होती. विशेषत: शेतीचे फार मोठे नुकसान या पावसामुळे झाले आहे. शासनाकडून पूरग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात आली. मात्र, पावसाने झालेल्या नुकसानाच्या तुलनेत ही मदत तुटपुंजीच होती. पनवेलमध्ये झालेल्या विक्र मी पावसाचा फटका पटेल मोहल्ला, टपालनाका, गाढी नदीपात्राजवळील परिसर, बावनबंगला परिसर आदीसह शहरातील गाढी नदीपात्रालगतचे ठिकाण काळुंद्रे, कासाडी नदीलगतच्या ठिकाणांना बसला आहे. या नद्यांच्या लगत तीन ते चार फूट पाणी साचले होते. एकीकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी केलेल्या भरावामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्यास लागणार उशीर, त्यातच सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पनवेलकर हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे, २६ जुलै २००५ साली पडलेल्या पावसापेक्षा जास्त पर्जन्यमान २०१० मध्ये झाले होते. अद्याप महाराष्ट्रात परतीचा पाऊस दाखल झाला नसल्याने पावसाचा जोर सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.>२९ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तुटलापनवेल तालुक्यात यावर्षी ४७३७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी १९९० मध्ये ४२२२.८० मि.मी. पाऊस पनवेल परिसरात पडला होता. मात्र, २०१९ मध्ये पडलेल्या पावसाने १९९० सालच्या पावसाचा विक्रम मोडीत काढला आहे.>२६ जुलै २००५ पेक्षा जास्त पाऊस२६ जुलै २००५ साली ३६४२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली होती. यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे पनवेल, कळंबोली, खारघर, नवीन पनवेल, खांदेश्वर तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. २०१९ साली जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.>हवामानातील बदलामुळे अशाप्रकारे अतिवृष्टी होत असते. सध्याच्या घडीला जगभरात अशाप्रकारे नवीन समस्या निर्माण झाली आहे, याकरिता पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे.- डॉ. सुरेश दोडके,शास्त्रज्ञ,खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल

टॅग्स :Rainपाऊस