खैरवाडी येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम चार ते पाच वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. निधीअभावी हे काम रखडल्याचे बोलले जात आहे. निधी मंजूर होऊन पाण्याची टाकी केव्हा बांधून होणार, असा प्रश्न आदिवासी बांधवांकडून विचारण्यात येत आहे. ...
चणेरा लघु पाटबंधारे (म्हसेवडी धरण) योजनेतील काम सुरू न होताच तब्बल ७३ लाख रुपये खर्च झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे या धरणासाठी नेमका कुठे आणि कसा खर्च करण्यात आला असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. ...
पनवेल महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे व सत्ताधारी भाजपा यांच्यातील शीतयुद्धाने आता वेगळेच वळण घेतले आहे. भाजपाने आयुक्त शिंदे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात पालिकेने कडक भूमिका घेतली आहे. शहरातील २६ जणांकडे एकूण ४ कोटी ४१ लाख रुपयांची थकबाकी असून त्यांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. ...
शहरातील तापमान ३८ डिग्री अंश सेल्सिअसवर गेले आहे. वाढता उकाडा, तसेच हवेतील दमटपणामुळे सर्वच नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाच्या काहिलीपासून सुटका होण्यासाठी नागरिकांची पावले रसवंतीगृह, शीतपेयांकडे वळू लागली आहेत. शहाळे, लिंबू व इतर शीतपेयांची मागणी वाढ ...
गृहनिर्मिती हा स्थापनेचा मुख्य पाया असलेल्या सिडकोला गृहबांधणीचा विसर पडल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. कारण गेल्या ४९ वर्षांत सिडकोने चार शहरात फक्त १ लाख ८३ हजार घरांची निर्मिती केली आहे. ...
सायन - पनवेल महामार्गावर सानपाड्याजवळ जुई पुलावर शनिवारी रात्री अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला. एक वर्षात ६ जणांचा मृत्यू झाला असून ५० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. ...
आरे कॉलनी येथील युनिट क्रमांक ३२मधील आंब्याच्या झाडाच्या खोडावर खोल छिद्र पाडून त्यात अॅसिडसदृश विषारी द्रव्याचा वापर करत झाड मारण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या प्रकरणी वनराई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ...
समाजातील विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करून, इतरांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केलेल्या पनवेल, उरण, खोपोली, कर्जत व पेणमधील महिलांचा रविवारी पनवेलमध्ये सन्मान करण्यात येणार आहे. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने ‘लोकमत’ आणि ओरिअन मॉलतर्फे ‘सखी ...
नेरु ळ येथील पाम टॉवर सोसायटीतील एफएसआय घोटाळा पुन्हा चर्चेत आला आहे. या घोटाळ्यामुळे सिडकोला जवळपास ५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करीत, या संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत विभागाच्या मार्फत चौकशी करण्याची मागणी एमसीएचआय-क्रेडाई, नवी मुंबई युनिटचे ...