कोरोनाची साखळी तोडण्याकरिता पालिकेकडून दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या चौथ्या दिवशी पोलिसांनी एकूण २ हजार ४७६ कारवाया केल्या आहेत. ...
नवी मुंबई महानगरपालिकेने वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये १,१८३ बेड्स क्षमतेचे कोविड रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयामध्ये ४८३ आॅक्सिजन बेड्सची सुविधा करण्यात आलेली आहे. ...
सार्वजनिक ठिकाणी जाताना नागरिकांनी सामाजिक अंतर राखणे, नाका-तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र, काही नागरिक नियमांचे पालन करताना दिसून आले, तर काहींनी नियम पायदळी तुडवल्याचे ‘लोकमत’ने घेतलेल्या रिअॅलिटी चेकमध्ये दिसून आले ...
अनधिकृत फेरीवाल्यांवर व विनाकारण रोडवर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात नाही. नियम धाब्यावर बसविणाºया मूठभर नागरिकांचा फटका सर्वच शहरवासीयांना बसू लागला आहे. ...
लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. पहिल्या दिवशी ४८४ जणांवर कारवाई केल्यानंतर दुसºया दिवशी रविवारी ७३७ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. ...
सर्व नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करावे व पांडवकडा या प्रतिबंधक क्षेत्रात प्रवेश करु नये असे आवाहान खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी केले आहे. ...