वैभव गायकर
पनवेल- पनवेल महानगरपालिकेत मालमत्ता कर वाढीचा मुद्दा गाजत आहे. विरोधकांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ५०० च्या स्टॅम्प पेपरवरील मालमत्ता करतील ६५ टक्के सुटीचे एफिडेव्हिट हे फसवे असून पनवेलकर त्याला भूलणार नसल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कळंबोली येथे केली. भाजपाने व्हिजन २०३० या संकल्पनेवर आधारित काय म्हणता पनवेलकर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अभिनेते प्रसाद ओक आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी फडणवीस यांच्याशी संवाद साधला त्यावेळी विविध प्रश्नांवर फडणवीस बोलले.
खोटे आश्वासन द्यायला आपल्या बापाचे काय जाते ? असे म्हणत पनवेलमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना माहीत आहे की, आपण सत्तेत येणार नसल्याने त्यांनी मालमत्ता कराचे एफिडेव्हिट सादर करीत नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्याचा पुनरुच्चार करीत नाव देण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आ.प्रशांत ठाकूर, आ.विक्रांत पाटील, आ.महेश बालदी, जे एम म्हात्रे, प्रीतम म्हात्रे, शिंदे गटाचे नेते रामदास शेवाळे आदींसह मोठ्या प्रमाणात महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना फडणवीस यांनी पनवेलचा पाणीप्रश्न लवकर सुटेल न्हावा शेवा टप्पा ३ प्रकल्पामुळे पनवेलचा पाणीप्रश्न सुटेल तसेच भविष्यात पाण्याचा प्रश्न २०५० पर्यंत मार्गी लावण्याकरिता शिलार आणि पोशीर या धरण उभारणी करण्यात येणार आहे. याकरिता टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. नवी मुंबई,नैना,पनवेल महानगरपालिका हे भविष्यातील ग्रोथ इंजिन आहे. याठिकाणी जगभरातील आधुनिक युनिव्हर्सिटी येणार आहेत. मुंबई विमानतळावरील केवळ एका रनवेमुळे लँडिंगला करता येत नसल्यामुळे १ टक्के जीडीपी थांबला होता. तो जीडीपी नवी मुंबई विमानतळामुळे वाढेल असे फडणवीस म्हणाले.
Web Summary : Chief Minister Fadnavis criticized the opposition's property tax waiver affidavit in Panvel as deceptive. He highlighted development plans including the Navi Mumbai airport and water projects, promising solutions to long-standing issues and future growth.
Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस ने पनवेल में विपक्ष के संपत्ति कर माफी हलफनामे को भ्रामक बताया। उन्होंने नवी मुंबई हवाई अड्डे और जल परियोजनाओं सहित विकास योजनाओं पर प्रकाश डाला, दीर्घकालिक मुद्दों और भविष्य के विकास के समाधान का वादा किया।