करंजाडेतील उघडे गटार जनावरांच्या पथ्यावर, दोन महिन्यातील दुसरी घटना

By वैभव गायकर | Published: April 23, 2023 07:29 PM2023-04-23T19:29:02+5:302023-04-23T19:29:35+5:30

अग्निशमन दलाने शर्तींचे प्रयत्न केल्याने या म्हैसला सुखरूप गटारातून बाहेर काढण्यात आले.

Open drains in Karanjade on cattle tracks, second incident in two months | करंजाडेतील उघडे गटार जनावरांच्या पथ्यावर, दोन महिन्यातील दुसरी घटना

करंजाडेतील उघडे गटार जनावरांच्या पथ्यावर, दोन महिन्यातील दुसरी घटना

googlenewsNext

पनवेल: करंजाडे सेक्टर 5 मध्ये उघड्या गटारावरील झाकणे गायब झाल्याने रविवारी म्हैस या गटारात अडकल्याची घटना घडली.अग्निशमन दलाने शर्तींचे प्रयत्न केल्याने या म्हैसला सुखरूप गटारातून बाहेर काढण्यात आले.

 करंजाडे नोड सिडकोच्या अखत्यारीत येते.नव्याने वसवलेल्या या नोड मध्ये प्राथमिक सिविधांचा मोठा आभाव आहे.पाणी,रस्ते,उघडी गटारे या सर्वच समस्यांची ओरड पहावयास मिळत असतात.उघड्या गटारात जनावरे अडकण्याची अथवा पडण्याच्या घटना शहरात वाढत आहेत.मागील महिन्यात देखींच अशाच प्रकारे म्हैस गटारात अडकली होती.स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला बोलावल्यावर त्या म्हैशीला सुखरूप गटारातून बाहेर काढण्यात आले.

रविवारची घटना देखील मागील घटनेची पुनरावृत्ती करणारी ठरली.वारंवार घडणा-या या प्रकारावरून राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहर अध्यक्ष करंजाडे शहराध्यक्ष रंजित नरुटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.सिडकोच्या गलथान कारभाराचा फटका मुक्या जनावरांना सोसावा लागत असल्याचा आरोप नरुटे यांनी केला.एखादा नागरिक गटारात अडकल्यावर सिडको प्रशासनाला जाग येईल का ? असाही प्रश्न नरुटे यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Open drains in Karanjade on cattle tracks, second incident in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.