शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कांदा-बटाटा मार्केटची इमारत धोकादायक; व्यापारी, माथाडी कामगारांचा जीव मुठीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 00:33 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केट मुंबईवरून नवी मुंबईमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय शासनाने ऐंशीच्या दशकात घेतला.

- नामदेव मोरेनवी मुंबई : शहरातील अतिधोकादायक इमारतींमध्ये एपीएमसीमधील कांदा-बटाटा मार्केटचाही समावेश आहे. पुनर्बांधणी रखडल्यामुळे येथील व्यापारी, माथाडी कामगार व इतर घटकांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. पावसाळ्यात अपघाताची शक्यता वाढली असून, मुंबईसारखी एखादी दुर्घटना घडली, तर जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केट मुंबईवरून नवी मुंबईमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय शासनाने ऐंशीच्या दशकात घेतला. १८८१ मध्ये सर्वप्रथम कांदा-बटाटा मार्केट स्थलांतरित करण्यात आले. ७.९२ हेक्टर जमिनीवर २४३ गाळे उभारण्यात आले, परंतु वीस वर्षांत मार्केटमधील अनेक गाळ्यांचे प्लास्टर कोसळू लागले. नवी मुंबई महानगरपालिकेने सर्वप्रथम काही विंग व नंतर संपूर्ण मार्केटच धोकादायक घोषित केले आहे.

मार्केटचा वापर थांबविण्याच्या सूचना बाजार समिती प्रशासन व व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. प्रशासनाने मार्केटची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने ही पुनर्बांधणी करण्यास परवानगी दिली आहे, परंतु विविध कारणांमुळे पुनर्बांधणीचे काम रखडत गेले व धोकादायक इमारतींमध्येच व्यापार सुरू ठेवण्यात आला. गतवर्षी मार्केट खाली करण्याच्या नोटीस प्रशासनाने दिल्या होत्या.

मॅफ्को मार्केटजवळील मोकळ्या भूखंडावर तात्पुरते शेड उभारून, व्यापार तेथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु तेथे जागा अपुरी असल्याने व्यापाऱ्यांनी शासनाकडे विनंती केली व पुन्हा आहे तेथेच व्यापार सुरू करण्यात आला. यामुळे या धोकादायक इमारतीत काम करताना कामगार, व्यापारी हे जीव मुठीत घेऊनच वावरत असल्याचे दिसून येत आहे.दररोज पाच हजारांपेक्षा जास्त नागरिकांची ये-जासद्यस्थितीमध्ये कांदा-बटाटा मार्केटमध्ये व्यापारी, माथाडी कामगार, ग्राहक, वाहतूकदार व इतर सर्व मिळून दररोज पाच हजारांपेक्षा जास्त नागरिकांची ये-जा सुरू असते.मार्केटचा काही भाग कोसळला, तर अनेकांचा जीव जाण्याची शक्यता आहे. मार्केटची स्थिती गंभीर झाली आहे. अनेक ठिकाणी टेकू लावण्यात आले आहेत. प्लास्टरच्या आतील लोखंड बाहेर दिसू लागले आहे. अनेक ठिकाणी पिलर्सला तडे गेले आहेत.मालाची चढ-उतार करणाºया धक्क्याची दुरवस्था झाली आहे. गटारांमधून पाण्याचा निचरा होत नाही. अनेक ठिकाणी पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. कोणत्याही क्षणी बांधकाम कोसळेल, अशी परिस्थिती असून, शासन व प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नाही, तर दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कांदा-बटाटा मार्केटमधील इमारती महानगरपालिकेने धोकादायक घोषित केल्या आहेत. गेल्या वर्षी मार्केट मोकळे करण्यात येणार होते, परंतु शासनाने त्यास स्थगिती दिलेली आहे. पुनर्बांधणीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही प्रयत्न सुरू आहेत. धोकादायक ठिकाणी व्यापाºयांनी तात्पुरती दुरुस्तीही केली आहे.- अनिल चव्हाण,सचिव, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई