शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
7
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
8
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
9
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
10
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
11
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
12
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
13
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
14
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
15
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
16
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
17
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
18
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
19
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
20
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड

अधिकारी, कर्मचाऱ्यांची सोमवार, शुक्रवारची सुट्टी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:03 PM

पनवेल मनपा आयुक्तांचा निर्णय; पाच दिवसांचा आठवडा

पनवेल : राज्य सरकारने पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला आहे. २९ फ्रेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य शासनाने संबंधित शासकीय यंत्रणांना दिले आहेत. त्यानुसार पनवेल महापालिकेनेही त्या दृष्टीने पावले उचलली आहेत. सलग सुट्ट्यांमुळे शासकीय कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी नव्याने परिपत्रक काढत सोमवार व शुक्रवारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुट्टी घेण्यास मनाई केली आहे.पाच दिवसांचा आठवडा केल्याने शासकीय अधिकारी तसेच कर्मचाºयांना शनिवार, रविवार अशी दोन दिवसांची सलग सुट्टी मिळणार आहे. राज्यभरातील शासकीय कार्यालयात या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. पनवेल महानगरपालिकेने पाच दिवसांच्या आठवड्याचे काटेकोर पालन व्हावे, तसेच पालिकेत येणाºया नागरिकांची कामे वेळेवर व्हावीत, याकरिता अधिकारी तसेच कर्मचाºयांना सहजरीत्या मिळणाºया सुट्टीवर सोमवार व शुक्रवारी बंदी घातली आहे. शनिवार, रविवार या दोन सुट्ट्यासोबत काही कर्मचारी अथवा अधिकारी अतिरिक्त सुट्टी घेऊन सरसकट तीन दिवस सुट्ट्यांचा बेत करू शकतात, त्यामुळे याचा परिणाम पालिकेच्या कामकाजावर पडण्याची शक्यता आहे. पनवेल महानगरपालिकेत अद्यापही कर्मचाºयांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे सलग दोन सुट्ट्यांचा फायदा घेत अतिरिक्त एक दिवसाची रजा वाढविल्यास त्याचा परिणाम पालिकेच्या कामकाजावर होण्याची शक्यता असल्याने आयुक्त गणेश देशमुख यांनी ही संकल्पना पनवेल महानगरपालिकेत राबविली आहे.पनवेल महानगरपालिकेतील सर्व कार्यालयांच्या व त्या अनुषंगाने अधिकारी, कर्मचाºयांच्या कामकाजाची वेळ ४५ मिनिटांनी वाढविण्यात आली आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी सुधारित वेळ राहणार आहे. सर्व कार्यालयातील शिपाई कर्मचाºयांसाठी सोमवार ते शुक्रवारी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० अशी राहणार आहे. दुपारी १.३० ते २ अशी एकूण ३० मिनिटे भोजनाची सुट्टी राहणार आहे.पाच दिवसांचा आठवडा २९ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे, त्यामुळे शनिवार, रविवार या दोन दिवसांच्या रजेमुळे अनेक जण सलग तिसºया सुट्टीसाठी किरकोळ रजा टाकून मोकळे होऊ शकतात. याचाच परिणाम पालिकेच्या कामकाजावर होणार असल्याने सोमवार व शुक्रवारी रजेवर बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक वेळेचे महत्त्व लक्षात घेता ही सुट्टी दिली जाईल.- गणेश देशमुख,आयुक्त, पनवेल महानगरपालिका