खंडणी न दिल्याने अश्लील व्हिडीओ व्हायरल,सोशल मीडियावरील प्रकार; गुन्हा दाखल

By सूर्यकांत वाघमारे | Published: May 18, 2024 04:49 PM2024-05-18T16:49:21+5:302024-05-18T16:49:48+5:30

तरुणीच्या व्हिडिओद्वारे १५ हजाराची मागणी. 

obscene videos viral on social media due to non payment of ransom in navi mumbai | खंडणी न दिल्याने अश्लील व्हिडीओ व्हायरल,सोशल मीडियावरील प्रकार; गुन्हा दाखल

खंडणी न दिल्याने अश्लील व्हिडीओ व्हायरल,सोशल मीडियावरील प्रकार; गुन्हा दाखल

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई : अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन १५ हजाराच्या खंडणीची मागणी केल्याची घटना घडली आहे. मात्र, तरुणाने पैसे देण्यास नकार दिल्याने अज्ञाताने बनावट अकाऊंटवरून तरुणीचा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. 

सोशल मीडियाचा वापर खंडणीसाठी देखील होऊ लागल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी १८ वर्षीय युवकाच्या  तक्रारीवरून अज्ञात सोशल मीडिया अकाउंट वापरकर्त्यावर सानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तरुणाकडे त्याच्या मैत्रिणीचे व त्याचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अज्ञाताने सोशल मीडियाद्वारे दिली होती. तर हा प्रकार थांबवण्यासाठी त्याच्याकडे १५ हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिला होता. यामुळे अज्ञात व्यक्तीने त्याच्या मैत्रिणीचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. त्यांच्याच मित्रांना हे व्हिडीओ पाठवल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तरुणाने सानपाडा पोलिसांकडे तक्रार केली असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: obscene videos viral on social media due to non payment of ransom in navi mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.