शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलमध्ये 26,930 रुग्ण वाढले, मृत्युदर रोखण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 00:28 IST

नवी मुंबईची एक लाख रुग्णसंख्येकडे वाटचाल : मृत्युदर रोखण्याचे आव्हान

नामदेव मोरे

नवी मुंबई : एप्रिल महिना नवी मुंबईकरांसाठी सर्वाधिक धोकादायक ठरला आहे. एक महिन्यात तब्बल २६,९३० रुग्ण वाढले असून १९४ जणांचा मृत्यू झाला आहे. एक लाख रुग्णसंख्येच्या दिशेने शहराची वाटचाल सुरू झाली आहे. रुग्णवाढीपेक्षा मृत्यूचा वाढणारा आकडा चिंताजनक असून मृत्युदर रोखणे हेच आरोग्य यंत्रणेसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.

नवी मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून या संकटाशी यंत्रणा लढा देत आहे. मार्च ते सप्टेंबर दरम्यान रुग्णसंख्या झपाट्याने वाढत राहिली. जुलैमध्ये सर्वाधिक १४,९६७ रुग्ण वाढले व २०७ जणांचा मृत्यू झाला होता. ऑगस्ट व सप्टेंबरमध्येही १० हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढले. पहिल्या लाटेमध्येही शहरात बेडची कमतरता निर्माण झाली होती. महानगरपालिकेने वाशीमध्ये १२०० बेडचे रुग्णालय सुरू केले. खासगी रुग्णालयांची मदत घेतली. बेडची संख्या वाढविली. ब्रेक द चेन अभियानही प्रभावीपणे राबविल्यामुळे ऑक्टोबरपासून पहिली लाट ओसरण्यास सुरुवात झाली. ऑक्टोबर ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत पाच महिने सातत्याने रुग्णसंख्या कमी होत होती. शहरात आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेडची कमतरता निर्माण झाली. 

वेळेत आयसीयू सुविधा मिळत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढू लागले.  

नोव्हेंबरपासून मार्चपर्यंत मृत्युदर नियंत्रणात होता. पाच महिने सरासरी शंभरपेक्षा कमी मृत्यू होत होते. एप्रिलमध्ये मृत्युदरानेही उसळी घेतली व एका महिन्यात १९४ जणांचा मृत्यू झाला. पहिली लाट ओसरल्यानंतर पुन्हा रुग्ण वाढतील याचा अंदाज आरोग्य विभागास आला नाही. पहिल्या लाटेचा अनुभव असतानाही व्हेंटिलेटर्स व आयसीयू बेड वाढविण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. यामुळे दुसरी लाट धोकादायक ठरली. आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली. रण एप्रिलमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे शहरवासीयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर मनपाने पुन्हा गाफील राहू नये. आरोग्य विभागातील उणिवा भरून काढाव्या. शहरात आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेडची क्षमता वाढवून ऐरोली व नेरूळ रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालवावे, अशी मागणी होऊ लागली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई