‘एनएमएमटी’ आगप्रकरणी जेबीएमला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 07:38 IST2025-06-08T07:38:36+5:302025-06-08T07:38:58+5:30

Navi Mumbai: ‘एनएमएमटी’च्या पाच बस आगीत जळून खाक झाल्याच्या दोन दुर्घटनांनंतर जागे झालेल्या नवी मुंबई परिवहन उपक्रमाने या बसचे मूळ उत्पादक आणि पुरवठादार मे. एम. एच. इको लाइफ तथा जेबीएम यांना नोटीस बजावून सात दिवसांच्या आत अहवाल देण्यास सांगितले आहे.

Notice to JBM in NMMT fire case | ‘एनएमएमटी’ आगप्रकरणी जेबीएमला नोटीस

‘एनएमएमटी’ आगप्रकरणी जेबीएमला नोटीस

नवी मुंबई : ‘एनएमएमटी’च्या पाच बस आगीत जळून खाक झाल्याच्या दोन दुर्घटनांनंतर जागे झालेल्या नवी मुंबई परिवहन उपक्रमाने या बसचे मूळ उत्पादक आणि पुरवठादार मे. एम. एच. इको लाइफ तथा जेबीएम यांना नोटीस बजावून सात दिवसांच्या आत अहवाल देण्यास सांगितले आहे. तसेच केंद्र शासनाच्या अखत्यारितील सीआयआरटी संस्थेमार्फत सर्व इलेक्ट्रिक बसचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.

एनएमएमटीच्या घणसोली आगारात ४ जूनला कार्यशाळेमध्ये दुरुस्तीसाठी उभी असलेली मे.जे.बी.एम. निर्मित इलेक्ट्रिक बसला आग लागली होती. त्या बसला लागलेल्या आगीमुळे तिच्या बाजूस उभ्या असलेल्या ३  बसही खाक झाल्या. एकाचवेळी चार बस खाक झाल्याची घटना ताजी असतानाच मार्ग क्र.१४४ वर कार्यरत असलेली इलेक्ट्रिक बस मरोळ बसस्थानक, अंधेरी पूर्व येथे संध्याकाळी आग लागून खाक झाली. दोन्ही दुर्घटना इंजिनात बिघाड होऊन बॅटरी पॅकमध्ये  शॉर्टसर्किट होऊन घडल्याचे निदर्शनास आले.

१९५ इलेक्ट्रिक बस ताफ्यात 
नवी मुंबई पालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात जेबीएमच्या इलेक्ट्रिक वातानुकूलित स्वमालकीच्या ३०तसेच जीसीसी तत्त्वावरील १६५ बस कार्यरत आहेत. या बसची दुरुस्ती करण्याची जबाबदारी जेबीएम यांची आहे.
 

Web Title: Notice to JBM in NMMT fire case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.