शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

एनएमएमटीकडे ४० सीएनजी बसेस; केंद्र शासनाच्या योजनेतून होणार खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 00:25 IST

बसेसची खरेदी ठेकेदार करणार असून महापालिका प्रतिकिलोमीटर ५०.४८ रुपये प्रमाणे त्यांना मोबदला देणार आहे.

नवी मुंबई :इलेक्ट्रिक बसेसनंतर महापालिकेने ४० सीएनजी बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी वाहतूक व्यवस्थेच्या खासगी सहभागाअंतर्गत या बसेस खरेदी करण्यात येणार असून या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमात सध्या ५०० बसेसद्वारे सेवा देण्यात येत आहे. तथापि, सदर बसेसमधून कालबाह्य झालेल्या ५० बसेस भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वर्षभरात १०० अशा एकूण १५० बसेस १० वर्षांपेक्षा जास्त जुन्या असून त्या निर्लेखित केल्या जाणार आहेत. यामुळे महापालिकेने १०० इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून आता त्यामध्ये ४० सीएनजी बसेसचाही समावेश होणार आहे. केंद्र शासनाच्या योजनेतून ठेकेदाराच्या माध्यमातून घेतल्या जाणार आहेत. सर्व बसेस महापालिकेने निश्चित केलेल्या मार्गावर चालविण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली जाणार आहे. बसेसची खरेदी, दुरुस्ती, चालक, इंधन, विमा, साफसफाईचा खर्च ठेकेदार करणार आहे. वाहक व पर्यवेक्षकीय अधिकारी ही परिवहन उपक्रमाची जबाबदारी असणार आहे. बसेसच्या माध्यमातून प्राप्त होणारा महसूल हा उपक्रमाने जमा करावयाचा असून ठेकेदारास प्रति किलोमीटरप्रमाणे शुल्क अदा करावयाचे आहे. बसेसवरील जाहिरातीपासून मिळणारे उत्पन्न परिवहन उपक्रमाचे असणार आहे.

बसेसची खरेदी ठेकेदार करणार असून महापालिका प्रतिकिलोमीटर ५०.४८ रुपये प्रमाणे त्यांना मोबदला देणार आहे. वार्षिक जवळपास १६ कोटी ४८ लाख रुपये खर्च होणार आहे. याशिवाय वाहकाच्या वेतनासाठी महिन्याला २३ लाख रुपये खर्च करावे लागणार असून सर्वसाधारण सभेने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.बससेवा सुरू करण्यासाठी पालिकेची जबाबदारी

  • बसेस पार्किंग व कार्यशाळेकरिता जागा उपलब्ध करून सर्व सुविधांयुक्त आगार उपलब्ध करून द्यायची आहे.
  • बसमार्ग व बसचे वेळापत्रक निश्चित करण्याची जबाबदारी परिवहनची असणार आहे.
  • तिकीट दर निश्चित करण्याची जबाबदारीही पालिकेची असेल.
  • बस मार्गाचे संबंधित सर्व परवाने परिवहनने प्राप्त करावयाचे आहेत.

महत्त्वाच्या अटीकंत्राटाचा कालावधी दहा वर्षांचा असणार आहे. बसेसचे सुटे भाग व दुरुस्ती, अपघात दुरुस्तीचे काम ठेकेदार स्वत: करेल. बसेसवरील जाहिरातीचे हक्क परिवहनकडे असणार आहेत. शासकीय कर भरण्याची जबाबदारीही ठेकेदाराची असणार आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाnmmcनवी मुंबई महापालिका