शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 06:03 IST

या मार्गिकेतून अवघ्या ३० मिनीटांत दोन्ही विमानतळे गाठता येतील.  अंदाजे ३५ किमीची ही मार्गिका भूमिगत तसेच उन्नत असणार आहे

नवी मुंबई -  सिडको छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडणारी गोल्डन मेट्रो मार्गिका क्रमांक ८ उभारणार आहे.

या मेट्रो मार्गिकेचे बांधकाम आणि संचालनाचा आढावा तसेच अंमलबजावणी आणि डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवालाचे पुनरावलोकन करण्यासाठी सिडको सल्लागाराच्या शोधात असून त्याअनुषंगाने निविदाही जारी करण्यात आली आहे.  ही मार्गिका कमी थांब्यांमुळे विमानतळ एक्स्प्रेस मार्गिका म्हणून विकसित केली जाण्याची अपेक्षा आहे. या मार्गिकेतून अवघ्या ३० मिनीटांत दोन्ही विमानतळे गाठता येतील.  अंदाजे ३५ किमीची ही मार्गिका भूमिगत तसेच उन्नत असणार आहे. यात ९.२५ किलोमीटर भुयारी आणि २५.६३ किलोमीटर उन्नत मार्गाचा समावेश आहे. 

असा असेल नवीन मार्गहा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २ पासून सुरू होईलछेडानगरपर्यंत भुयारी असेल आणि त्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत उन्नत मार्ग असेल. या मार्गावर कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, मानखुर्द, वाशी, नेरूळ आणि बेलापूर अशी महत्वाची ठिकाणे असतील.

पीपीपी तत्त्वावर मार्गिकेचे बांधकामसार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी)वर विकसित करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. सविस्तर प्रकल्प अहवालाचे पुनरावलोकन पूर्ण केल्यानंतर, या मार्गिकेच्या संरेखनात काही बदल होऊ शकतात. दाखल गुन्ह्यात नस्ली वाडिया यांच्यासह मौरीन नस्ली वाडिया (७८), नेस नस्ली वाडिया (५४), जहांगीर ऊर्फ जेह नस्ली वाडिया (५२), एच. जे. बामजी (७५), के. एफ. भारुचा आणि आर. ई. वंदेवाला (६५) यांच्या नावांचा समावेश आहे.

मेट्रो ८ चा खर्च १५ हजार कोटीमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि सिडकोच्या संयुक्त विद्यमाने हा १५ हजार कोटींचा मार्ग उभारला जाणार आहे. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा पहिला मेट्रो मार्ग असणार असल्याने तो जलद गतीने बांधण्यावर भर देण्यात येणार आहे. सर्व प्रकिया पूर्ण केल्यानंतर २०२६ च्या मध्यापासून बांधकामास सुरुवात करून २०२८ च्या अखेरीस ते पूर्ण होण्याचा अंदाज आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Navi Mumbai's Golden Metro: DPR Review, Airport Access in 30 Minutes

Web Summary : Navi Mumbai plans a Golden Metro (Line 8) connecting both airports. A consultant will review the DPR for this express line, expected to run underground and elevated. It will significantly cut travel time between airports, aiming for a 2028 completion.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळMetroमेट्रो