शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणच्या २७ गावांसाठी नवी पालिका

By admin | Updated: December 31, 2014 01:54 IST

कल्याण-डोंबिवलीलगतच्या २७ गावांच्या विकासासाठी एखादी नगर परिषद करता येईल काय, याचा विचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

मुंबई : कल्याण-डोंबिवलीलगतच्या २७ गावांच्या विकासासाठी एखादी नगर परिषद करता येईल काय, याचा विचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. ह्या परिसरात होणारा विकास लक्षात घेता, या भागात परवडणारी घरे योजना लागू करावी, यादृष्टीनेही नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रालगतच्या २७ गावांच्या आणि भिवंडी परिसरातील ६० गावांच्या प्रारूप विकास आराखड्यास मंजुरी देण्याचा निर्णय फडणवीस यांनी मंगळवारी घेतला, त्या वेळी ते बोलत होते.कल्याण येथे सोमवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये कल्याण-डोंबिवलीलगतच्या २७ गावांच्या विकास आराखड्याचा प्रश्न दोन दिवसांत सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार मंगळवारी मंत्रालयात नगरविकास विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नगररचना संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली होती. या विकास आराखड्याबाबत नगरविकास विभागामार्फत सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे दोन्ही विकास आराखडे मंजूर करण्याचा निर्णय घेतला. बैठकीस नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यू. पी. एस. मदान, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, सचिव मिलिंद म्हैसकर, प्रवीण दराडे, नगररचना संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, की मुंबईलगतचा हा परिसर असल्याने झपाट्याने विकास होत आहे. या भागात दळणवळणाच्या सुविधा, सांडपाणी निचरा व्यवस्था, रस्ते आदी विकास योजनांचे नियोजन पुढील २० वर्षांच्या लोकसंख्येचा आणि विकासाचा दर लक्षात घेऊन करावे, असेही ते म्हणाले.लॉजिस्टिक हब व्हावा : भिवंडी परिसरालगतच्या ६० गावांच्या विकास योजनेच्या आराखड्यासही सविस्तर चर्चेअंती मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. या परिसरात लॉजिस्टिक हब विकसित झाल्यास राज्य शासनाच्या महसुलात वाढ होईल़ त्या दृष्टीने नियोजनाच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.