नवी मुंबई : नवी मुंबईतील सर्वात मोठा नोड म्हणून ओळखल्या जाणाºया नेरुळ नोडला विविध समस्यांचा विळखा पडला आहे. वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करीत रस्त्याच्या दुतर्फा होणारी बेकायदा पार्किंग तसेच रस्त्यांना पडलेला गॅरेजचा विळखा यामुळे वाहतूककोंडीबरोबर लहान-मोठे अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाºया सुविधांचीही दुरवस्था झाली असून, लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.सर्वाधिक नागरी वस्ती नेरुळ विभागात असून, सर्वाधिक समस्याही याच विभागात आहेत. महापालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाºया विविध सुविधांचा बोजवारा उडाला असून, १८ नगरसेवक असलेल्या नेरुळ विभागातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. सिडकोने शहर वसविताना वाहने पार्किंगसाठी आरक्षित ठेवलेले भूखंड अपुरे पडू लागले असून, शहरात वाहन पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नोडमधील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा अनधिकृतपणे वाहने पार्किंग केली जात असल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील मुख्य रस्ते, चौक, रेल्वे स्थानकाबाहेरील रस्ते, शाळा, महाविद्यालय आदी ठिकाणी होणाºया बेकायदा पार्किंगवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून वाहतूक विभागाने नो पार्किंग, समांतर पार्किंग, सम-विषम पार्किंगचे फलक बसविल्यानंतरही वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करीत वाहने उभी केली जात आहेत. याकडे वाहतूक विभागही दुर्लक्ष करीत असल्याने सामान्य नागरिकांना वाहतूककोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. नेरु ळमधील विविध ठिकाणी सुरू असलेल्या अनधिकृत गॅरेजमुळे रस्ते आणि पदपथ व्यापले गेले असून, याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना आणि वाहनचालकांना ये-जा करताना विविध अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात वाहनांची आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम भागातील पदपथावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. पदपथापुढे रस्त्यावर हातगाड्या लावून भाजी, फळे विक्र ीचे व्यवसाय सुरू आहेत. तसेच जुईनगर सेक्टर २४, २५ भागातील पदपथावरही फेरीवाल्यांचे व्यवसाय सुरू आहेत. रस्ता आणि पदपथ अडवले जात असल्याने नागरिकांना रस्त्याच्या मध्यभागातून चालावे लागत असून वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण होत आहे.उद्याने गर्दुल्ल्यांचे अड्डेशहरातील नागरिकांना सुविधा देण्याच्या अनुषंगाने पालिकेच्या माध्यमातून उद्याने उभारण्यात आली आहेत. उद्यानांमध्ये लाखो रु पये खर्च करून हिरवळ, गजेबा, आकर्षक खेळणी, हिरवळ, जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम, विद्युत व्यवस्था आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत; परंतु उद्यानांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे उद्यानांमध्ये रात्री मद्यपींच्या पार्टी सुरू असतात. तसेच उद्यानांमधील साहित्याचेही नुकसान केले जाते. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला असून, उद्यानात २४ तास सुरक्षारक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे.पाण्याची नासाडीआणि विक्र ीस्वत:च्या मालकीचे धरण असलेली महापालिका म्हणून नवी मुंबई महापालिकेची ओळख आहे; परंतु अनेक ठिकाणी पाण्याची चोरी होत असून, पाइपच्या साहाय्याने गाड्या धुण्यासाठी पाण्याचा गैरवापर केला जात आहे. तसेच बांधकामासाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असून, महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयांमधून रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरपणे पार्किंग केलेली जड-अवजड वाहने धुण्यासाठी पाण्याची विक्र ी केली जात आहे.लाकडाच्या वखारींमुळे पदपथावर अडथळाशिरवणे भागात लाकडाच्या वखारी आहेत. या ठिकाणी लाकडाची वाहतूक करणारी वाहने अरु ंद रस्त्याच्या कडेला उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, वखारचालकांनी पदपथांची अडवणूक केली आहे, त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांना आणि वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.
नेरुळ विभागाला समस्यांचे ग्रहण; पार्किंगचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 01:07 IST