नवी मुंबई : गणेशोत्सवासाठी गावी गेलेल्या नागरिकाच्या घरात चोरी
By नामदेव मोरे | Updated: September 6, 2022 18:23 IST2022-09-06T18:22:38+5:302022-09-06T18:23:30+5:30
चोरट्यांनी पळवले अडीच लाखांचे दागिने.

नवी मुंबई : गणेशोत्सवासाठी गावी गेलेल्या नागरिकाच्या घरात चोरी
नवी मुंबई : गणेशोत्वासाठी गावी गेलेल्या नागरिकाच्या घरात चोरी झाल्याची घटना नवीन पनवेलमध्ये घडली आहे. चोरट्यांनी रो बंद घराचा कडी कोयंडा तोडून आतमधील अडीच लाख रुपयाचे दागिने चोरून नेले आहेत.
नवीन पनवेल सेक्टर १२ मध्ये राहणारे राहूल क्षीरसागर त्यांच्या कुटुंबीयांसह गणेशोत्सवासाठी २ सप्टेंबरला रोहा येथे गेले होते. सोमवारी सकाळी कुटुंबीयांसह घरी परत आल्यानंतर ते रहात असलेल्या रो हाऊसच्या दरवाजाचे कुलूप तोडले असल्याचे निदर्शनास आले. घरामधील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते.
कपाटातील तीन तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, अडीच तोळे वजनाचा नेकलेस,अर्धा तोळे वजनाची कर्नफुले, अर्धा तोळे वजनाची अंगठी, चांदीची लक्ष्मी मुर्ती, दोन गणेशमुर्ती व चांदीचे इतर दागिने असा अडीच लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी सोमवारी सायंकाळी खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.