Navi Mumbai: डंपरच्या धडकेने NMMT बस चालकाचा मृत्यू
By नारायण जाधव | Updated: August 16, 2023 21:57 IST2023-08-16T21:56:41+5:302023-08-16T21:57:11+5:30
Accident: डंपरच्या धडकेने दुचाकीवर असलेल्या NMMT बस चालकाच्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .

Navi Mumbai: डंपरच्या धडकेने NMMT बस चालकाचा मृत्यू
नवी मुंबई - डंपरच्या धडकेने दुचाकीवर असलेल्या NMMT बस चालकाच्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने NMMT चे बस चालकचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे समोर घडली आहे . गर्दीच्यावेळी हा अपघात झाल्याने रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. याप्रकरणी डंपर चालक फरार झाली आहे. NMMT बस चालक ड्यूटी संपल्याने आपला घरी जात होता त्यावेळी सदर घटना घडली आहे. पोलिस फरार डंपरचालकाचा शोध घेत आहेत. एनएमएमटी चालकाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे