Navi Mumbai Murder: नवी मुंबईत महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 14:05 IST2025-05-20T14:03:38+5:302025-05-20T14:05:34+5:30
Navi Mumbai Murder: याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Navi Mumbai Murder: नवी मुंबईत महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढळल्याने खळबळ
नवी मुंबईत एका महिलेचा राहत्या घरात मृतदेह आढल्याने परिसरात खळबळ माजली. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अल्विना किशोरसिंग उर्फ अल्विना अदमाली खान (वय, २७) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. अल्विना नवी मुंबईतील उलवा परिसरात वास्तव्यास होती. दरम्यान, सोमवारी सकाळी राहत्या घरात अल्विनाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ही हत्या रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्रीदरम्यान झाली आली असावी, अशी शंका वर्तवण्यात येत आहे.
महिलेच्या पतीने दाखल केलेल्या तक्रारीवरून, पोलिसांनी सोमवारी भारतीय न्याय संहिताच्या कलम १०३ (१) अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला, असे एनआरआय सागरी पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.