शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

कामगारांच्या कामचुकारगिरीला बसणार चाप, नवी मुंबई महापालिकेचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 4:04 AM

कामावर आल्यावर अर्ध्यातून निघून जाणे, स्वत: न येता दुसऱ्यालाच रोजंदारीवर पाठवून महापालिकेचा पगार लाटणे, नगरसेवकांसह पदाधिका-यांच्या घरी राबणे, असे प्रकार महापालिकेच्या विविध खात्यांतील कंत्राटी कामगारांकडून सर्रास होत आहेत.

- नारायण जाधवठाणे : कामावर आल्यावर अर्ध्यातून निघून जाणे, स्वत: न येता दुसऱ्यालाच रोजंदारीवर पाठवून महापालिकेचा पगार लाटणे, नगरसेवकांसह पदाधिका-यांच्या घरी राबणे, असे प्रकार महापालिकेच्या विविध खात्यांतील कंत्राटी कामगारांकडून सर्रास होत आहेत. हा गंभीर प्रकार महापालिका आयुक्त एन. रामास्वामी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी महापालिकेतील अशा सुमारे सहा हजार कंत्राटी कामगारांवर वॉच ठेवण्यासाठी ‘जिओ फेन्सिंग आणि टॅगिंग’चा पर्याय शोधला आहे. हे जिओ वॉच कामावर न येता पगार घेणारे, अर्ध्यातून कामावरून निघून जाणे, हजेरी लावून पळ काढणाºया कर्मचाºयांचा ठावठिकाणा शोधणार आहे.नवी मुंबई महापालिकेत साफसफाईसह पाणीपुरवठा, मलनि:सारण, इलेक्ट्रिकल खात्यात कंत्राटी पद्धतीवर सुमारे सहा हजार कामगार आहेत. अनेकदा ते ठेकेदार, महापालिकेचे पर्यवेक्षक, स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता अधिकारी आणि काही वेळेला स्थानिक नगरसवेकांशी हातमिळणी करून काम न करताच महापालिकेचा पगार लाटतात. महापालिकेत बायोमेट्रिक मशिन बसविल्या आहेत; परंतु, काही कामचुकार कंत्राटी कामगार या बायोमेट्रिक मशिनची नासधूस करतात. यामुळे त्यांची नक्की हजेरी समजत नाही. यात मशिन तुटल्यामुळे आर्थिक नुकसान होतेच. हे टाळण्यासाठी हा ‘जिओ फेन्सिंग आणि टॅगिंग’चा पर्याय आयुक्तांनी शोधला आहे.असा ठेवणार वॉच‘जिओ फेन्सिंग आणि टॅगिंग’ हे भारत सरकारच्या मालकीच्या इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन आॅफ इंडियाने निर्मित केलेले जीपीएसवर आधारित एक घड्याळ असून ते हातात बांधल्यानंतर संबंधित कामगार कामावर किती वाजता आला, तो कोणत्या कोणत्या क्षेत्रात फिरला, किती वेळ फिरला, किती वेळ बसून होता, दिलेल्या कामाच्या परीघाबाहेर तो किती वाजता व किती वेळ गेला हे सारे कळणार आहे. या घड्याळाची किंमत नाममात्र असून महापालिका ती भाड्याने घेणार असल्याने खर्चातही बचत होणार आहे. शिवाय हे घड्याळ ज्याच्या नावाने आहे त्याला दुसºयाला देता येणार नाही. यामुळे प्रॉक्सी कामगार पाठविणाºयांना वेसण बसणार आहे. शिवाय पदाधिकाºयांच्या घरी राबणाºया कामगारांवरही त्याची मात्रा लागू होणार असल्याने ते थांबण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे, हे घड्याळ तोडता येणार नसल्याने कामगारांनी नक्की काम किती केले, किती वाजता ते सुरू केले, हेसुद्धा समजणार असून ही घड्याळे कंत्राटी कामगारांबरोबरच पर्यवेक्षक, स्वच्छता निरीक्षक यांच्या हातात बांधले जाणार आहे. याचे मॉनिटरिंग डॅशबोर्डच्या माध्यमातून महापालिका आयुक्त, उपायुक्त, स्वच्छता अधिकारी हे आपल्या दालनातूनही करू शकणार असल्याची माहिती शहर अभियंता मोहन डगांवकर यांनी ‘लोकमत’ला दिली. महासभेच्या मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMuncipal Corporationनगर पालिका