शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
4
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
5
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
6
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
7
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
8
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
9
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
10
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
11
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
12
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
13
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
14
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
15
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
16
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
17
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
18
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
19
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
20
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली

लोकल वेळेवर धावण्यासाठीचे दीड हजार कोटी मिळण्यास नवी मुंबई मनपाची मंजुरी आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 01:58 IST

कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) या सुमारे २० ते २५ हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचा ५० टक्के हिस्सा देण्यास महाराष्ट्र शासनाने नकार दिला आहे.

- नारायण जाधव ठाणे : कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) या सुमारे २० ते २५ हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचा ५० टक्के हिस्सा देण्यास महाराष्ट्र शासनाने नकार दिला आहे. लोकलच्या वेळापत्रकात आमूलाग्र बदल घडवून चाकरमान्यांची लेटमार्कपासून सुटका करण्यासाठी असलेला हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. शासनाने यास नकार दिला असला तरी यातील चर्चगेट-विरार धिमा मार्ग आणि सीएसएमटी-पनवेल धिम्या मार्गासाठीच्या १३ हजार कोटींहून अधिक खर्चाची जबाबदारी एमएमआरडीए, सिडको, मुंबई महापालिकेने प्रत्येकी १५ टक्के, तर नवी मुंबई महापालिकेने ५ टक्के स्वीकारावी, असे आदेश शासनाने दिले होते. त्यानुसार, नवी मुंबई महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी येत्या अर्थसंकल्पापूर्वी सीबीटीसी प्रकल्पाकरिता ५ टक्के रक्कम देण्याचा प्रस्ताव फेबु्रवारीच्या महासभेसमोर ठेवला आहे.नगरविकास विभागाने ९ मार्च २०१८ रोजी दिलेला आदेश संदिग्ध असल्याने संपूर्ण सीबीटीसी प्रकल्पाचा खर्च २० ते २५ हजार कोटी गृहीत धरल्यास त्याची ५ टक्के रक्कम एक हजार ते दीड हजार कोटींच्या घरात जाते. यामुळे रेल्वेच्या प्रकल्पांमुळे कोणताही फायदा नसताना हे दीड हजार कोटी रुपये देण्यास नवी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी तयार होतील का, याबाबत शंका उपस्थित होत आहेत.‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त सर्वप्रथम गेल्या वर्षी दिले होते. तेव्हा मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे महापौर जयवंत सुतार यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. कारण, शासन आदेशाप्रमाणे मुंबई महापालिकेसह एमएमआरडीए, सिडकोला प्रत्येकी तीन हजार कोटींचा भार उचलावा लागणार आहे.या आदेशानंतर तब्बल एक वर्षाने या सर्व संस्थांच्या आधी नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी त्याची अंमलबजावणी सुरू केली असून त्यानुसार येत्या २० फेबु्रवारीच्या महासभेसमोर सीबीटीसी प्रकल्पासाठी ५ टक्के रक्कम देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी आणला आहे.कोणत्या मार्गांवर होणार सीबीटीसी प्रणालीमुंबईतील चर्चगेट-विरार धिमा मार्ग, सीएसएमटी-कल्याण-कसारा धिमा मार्ग आणि सीएसएमटी-पनवेल धिमा मार्ग या तीन उपनगरीय मार्गांवर सीबीटीसी प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यास रेल्वमंत्री पीयूष गोयल यांनी मान्यता दिली आहे. यानुसार, सीएसएमटी-कल्याण-कसारा मार्गावर ही प्रणाली लागू करण्याचा खर्च ९ हजार कोटी, चर्चगेट-विरार मार्गाचा खर्च ४,२२३ कोटी आणि सीएसएमटी-पनवेल मार्गाचा खर्च ४ हजार कोटींहून अधिक आहे. यातील आता पहिल्या टप्प्यात चर्चगेट-विरार धिमा मार्ग आणि सीएसएमटी-पनवेल धिम्या मार्गावर ही प्रणाली लागू करण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने ५० टक्के खर्चाची जबाबदारी उचलावी, असे रेल्वेचे निर्देश आहेत. मात्र, राज्य शासनाकडे आता निधीची चणचण असून राज्यावर आधीच चार लाख कोटींहून अधिक कर्ज आहे. त्यामुळे आता या तिन्ही मार्गांवरील खर्च शासनाने एमएमआरडीए, सिडको आणि मुंबई तसेच नवी मुंबई या पालिकांवर ढकलली.काय आहे सीबीटीसी प्रणालीसध्या मुंबई उपनगरीय रेल्वेचा कारभार पूर्णत: सिग्नल यंत्रणेनुसार चालतो. त्यामुळे उपनगरीय वाहतूक वेळेवर होण्यात अडचणी येतात. मात्र, सीबीटीसी प्रणालीनुसार अत्याधुनिक अशा संदेशवहनाने मोटारमन, गार्ड आणि नियंत्रण कक्ष यांच्यात सिग्नल यंत्रणेबाबत समन्वय होऊन वाहतूक सुरळीत आणि अपघातविरहित होण्यास मदत होणार आहे.तसेच दोन लोकलमधील अंतर कमी होऊन मुंबईकरांना जास्तीच्या लोकल उपलब्ध होणार आहेत. यात अधिकच्या लोकलसाठी डब्यांची खरेदीदेखील करण्यात येणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई