Navi Mumbai: जे पी नड्डा यांची खारघर येथील अश्वमेध यज्ञास भेट, मंदा म्हात्रे यांनी केले स्वागत

By नारायण जाधव | Published: February 22, 2024 03:38 PM2024-02-22T15:38:41+5:302024-02-22T15:39:08+5:30

Navi Mumbai: खारघर येथील पेठपाडा येथे सुरू असलेल्या अश्वमेध महायज्ञास  गुरूवारी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा  यांनी भेट दिली.  खारघर,  नवी मुंबई येथे त्यांचे आगम होताच आमदार मंदाताई म्हात्रे यांनी त्यांचे स्वागत केले.

Navi Mumbai: JP Nadda visits Ashwamedha Yajna at Kharghar, welcomed by Manda Mhatre | Navi Mumbai: जे पी नड्डा यांची खारघर येथील अश्वमेध यज्ञास भेट, मंदा म्हात्रे यांनी केले स्वागत

Navi Mumbai: जे पी नड्डा यांची खारघर येथील अश्वमेध यज्ञास भेट, मंदा म्हात्रे यांनी केले स्वागत

- नारायण जाधव
नवी मुंबई - खारघर येथील पेठपाडा येथे सुरू असलेल्या अश्वमेध महायज्ञास  गुरूवारी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा  यांनी भेट दिली.  खारघर,  नवी मुंबई येथे त्यांचे आगम होताच आमदार मंदाताई म्हात्रे यांनी त्यांचे स्वागत केले ! या प्रसंगी , उपमुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नड्डा यांच्यासमवेत होते. 

आपल्या राष्ट्राची एकता, प्राणीमात्रांचे कल्याण आणि जागतिक शांतीच्या उद्देशाने या महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे . यावेळी ‘1008 कुण्डीय महायज्ञ’मध्ये सहभागी होऊन. अद्वितीय आध्यात्मिक वातावरण आणि सकारात्मक ऊर्जेची अनुभूती मिळाली, अशा भावना  सर्वच उपस्थितांनी व्यक्त केल्या.  यावेळी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते, पार्टीतील सहकारी, पदाधिकाऱ्यांसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी होते.

२१ ते २५ फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमदेखील आयोजिले आहेत. यामध्ये १००८ कुंडिया महायज्ञ, वैदिक संस्कार, दीप महायज्ञ, आध्यात्मिक पुस्तक प्रदर्शन, रक्तदान आणि अवयव यासारखे सेवाभावी कार्यक्रमदेखील आयोजित केले आहेत. या सोहळ्याला पाच लाखांपेक्षा जास्त भक्त देशाच्या विविध कोनाकोपऱ्यातून उपस्थित राहणार असून, त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था कार्यक्रम ठिकाणी केली आहे

Web Title: Navi Mumbai: JP Nadda visits Ashwamedha Yajna at Kharghar, welcomed by Manda Mhatre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.