शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

सर्वोत्तम शहरामध्ये ‘नवी मुंबई’चा समावेश, देशातील लोकाभिमुख नागरी सुविधा देणारे शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 3:29 AM

केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने देशातील १११ शहरांमधील जीवनमान निर्देशांकाची तपासणी केली, यामध्ये देशातील दुसऱ्या क्रमांकाचे जगण्यायोग्य शहर म्हणून नवी मुंबईची निवड करण्यात आली आहे.

नवी मुंबई : केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने देशातील १११ शहरांमधील जीवनमान निर्देशांकाची तपासणी केली, यामध्ये देशातील दुसऱ्या क्रमांकाचे जगण्यायोग्य शहर म्हणून नवी मुंबईची निवड करण्यात आली आहे. २४ तास पाणीपुरवठा व सर्वोत्तम नागरी सुविधा देणाºया शहराला अजून एक बहुमान प्राप्त झाला आहे.देशातील पहिली स्मार्ट सिटी होण्याच्या दिशेने नवी मुंबईची वाटचाल सुरू झाली आहे. स्वच्छ भारत अभियानामध्ये घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशातील सर्वोत्तम शहर म्हणून नवी मुंबईची यापूर्वीच निवड झाली आहे. यानंतर आता देशातील जगण्यायोग्य शहरामध्येही नवी मुंबई पुण्यानंतर दुसºया स्थानावर आहे. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने यासाठी दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या १११ शहरांचे सर्वेक्षण केले होते. यामध्ये ‘फिजिकल, इन्स्टिट्यूशनल, सोशल आणि इकॉनॉमिकल’ अशा चार मुख्य निकषांच्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली.या चार निकषांमधील ‘इन्स्टिट्यूशनल’ निकषात गव्हर्नन्स, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, आॅनलाइन सर्व्हिसेस यामध्ये सर्वाधिक गुण प्राप्त होऊन देशातील सर्वोत्तम प्रशासन प्रणाली राबविणारे शहर म्हणून नवी मुंबई महानगरपालिका प्रथम क्र मांकाचे शहर ठरले. यामध्ये जनतेला लाभदायक प्रशासकीय सेवा पुरविणे, माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून संगणकीय प्रणालीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे, तक्र ार निवारण प्रणाली नागरिकांना समाधानकारक अशा कालमर्यादित पद्धतीने राबविणे, अशा विविध गोष्टींचे परीक्षण करण्यात आले. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका देशातील १११ शहरांमध्ये सर्वोत्तम ठरली.‘फिजिकल’ निकषात गृहनिर्माण, मोकळ्या जागा, ऊर्जास्रोत, पाणीपुरवठा अशा बाबींचा समावेश होता. तसेच ‘सोशल’ निकषात शिक्षण व आरोग्य त्याचप्रमाणे ‘इकोनॉमिकल’ निकषात अर्थकारण व रोजगार अशा बाबींचा समावेश होता. या चार निकषांच्या अनुषंगाने देशातील १११ शहरांचे परीक्षण करण्यात आले. साधारणत: चार महिने केंद्र सरकारच्या परीक्षण समितीमार्फत कागदपत्रे तपासणी व प्रत्यक्ष भेटी याद्वारे परीक्षण करण्यात आले. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका ५८.०२ गुणांकन प्राप्त करून देशातील द्वितीय क्र मांकाचे निवासयोग्य शहर म्हणून मानांकित ठरले. या क्र मवारीत नवी मुंबई महानगरपालिकेपेक्षा केवळ ०.०९ गुणांनी पुणे हे शहर पुढे असून (५८.११) त्यानंतर मुंबई, तिरु पती व चंदिगढ ही तृतीय, चतुर्थ व पंचम क्रमांकाची शहरे आहेत. या पुरस्कारामुळे नवी मुंबईच्या नावलौकिकामध्ये भर पडली आहे. भविष्यातही नवी मुंबईमध्ये वास्तव्य करणाºयांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करूनदेण्यासाठी महापालिका प्रयत्न करणार आहे.

सोयी-सुविधास्वातंत्र्यानंतर स्वत:चे धरण विकत घेणारी देशातील एकमेव महानगरपालिका२४ तास पाणीपुरवठा करणारी एकमेव महापालिकाघनकचरा व्यवस्थापनाची सर्वोत्तम यंत्रणाअत्याधुनिक तंत्रावर आधारित डम्पिंग ग्राउंडदेशातील सर्वात उत्तम व अत्याधुनिक तंत्रावर आधारित मलनि:सारण केंद्रखासगी व महापालिका रुग्णालयाचे विभागनिहाय जाळेदेशातील प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून शहराची ओळखदेशातील सर्वात जास्त जॉगिंग ट्रॅक व ओपन जिम असलेले शहररेल्वे व रस्त्यांच्या जाळ्यामुळे दळणवळणाची सर्वोत्तम सुविधाएमआयडीसी, एपीएमसी व जेएनपीटीमुळे रोजगाराच्यासंधीमहापालिका क्षेत्रामध्ये १५६ उद्याने, ६७ मोकळ्या जागा, ८ ट्री बेल्टचा समावेशनवी मुंबई महानगरपालिकेला यापूर्वीही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. पालिकेच्या स्थापनेपासून केलेल्या लोकाभिमुख कामांची ही पोचपावती असून हा सर्व सन्मान सर्व नवी मुंबईकरांचा आहे.- जयवंत सुतार,महापौर, नवी मुंबईमहानगरपालिकेस विविध नागरी सुविधांचा स्तर उंचावण्यावर व दर्जा राखण्यावर विशेष भर देत आहे. देशातील द्वितीय मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस लाभले आहे. येथील जनतेचे राहणीमान उंचाविण्यासाठी महानगरपालिका करत असलेल्या प्रयत्नांचे हे फलित आहे.- डॉ. रामास्वामी एन.,महापालिका आयुक्तमहापालिकेला मिळालेले पुरस्कार२००५ - ६ - संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये सन २००५ - ६ मध्ये प्रथम क्रमांकसर्व शिक्षा अभियानामध्ये २००७ - ८ व २००८ - ९ मध्ये प्रथम क्रमांकस्वच्छ भारत अभियान २०१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापनात देशात प्रथम क्रमांकस्वच्छ भारत सर्वेक्षणामध्ये २०१७ मध्ये राज्यात प्रथम व देशात ८ वा क्रमांक५ मे २०१७ रोजी नागरी विकास दिनाच्या निमित्ताने कचरा विभाजनमधील उल्लेखनीय कामगिरीकरिता पुरस्कार५ मे २०१७ मध्ये नागरी विकास दिनाच्या निमित्ताने सर्वाधिक करवसुलीकरिता पुरस्कारमहापालिका मुख्यालय हरित इमारत बांधकाम तत्त्वानुसार हुडकोचा २०१५ - १६ साठी पुरस्कारजेसीबी क्लीन अर्थ या संस्थेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन व विल्हेवाटीसाठी उत्कृष्ट कामगिरीसाठी २०१५ चा पुरस्कारईपीसी वर्ल्ड मीडिया समूहाच्या वतीने क्षेपणभूमी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास २०१४ मध्ये पुरस्कार२०११ मध्ये जलवितरण व्यवस्थेतील देखभाल व दुरूस्ती सेवेबद्दल राष्ट्रीय नागरी जलपुरस्कारराज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट नागरी आयसीटी पुरस्कारपालिकेच्या अपंग विद्यार्थ्यांकरिता शिक्षण व प्रशिक्षणासाठी पुरस्कार२०१० मध्ये संकलित पावसाळी पाणी निचरा पद्धतीकरिता राष्ट्रीय नागरी जल पुरस्कार२००९ मध्ये सांडपाणी व स्वच्छता सेवांमधील विकास कार्याकरिता सर्वोत्कृष्ट शहर पुरस्कार२००९ मध्ये पर्यावरण संवर्धनासाठी राज्य शासनाचा वसुंधरा पुरस्कार

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या