शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
2
"पंतप्रधान मोदी माझ्यावर नाराज..."; ट्रम्प यांना चुकीची जाणीव! भारतासोबोतच्या संबंधांवर काय म्हणाले?
3
विमा एजंटच्या अधिक कमिशनला चाप लावण्याची तयारी, कंपन्यांनी एका वर्षात वाटले ६०,८०० कोटी रुपये
4
गॅस चेंबर अन् भीषण स्फोट! DMRC इंजिनिअरचं कुटुंब झोपेतच संपलं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना
5
अवघ्या ५ हजार रुपयांत उभं केलं १३ हजार कोटींचं साम्राज्य! देशातील प्रत्येक घरात होतो वापर
6
सत्तेसाठी भाजपची थेट ओवेसींच्या AIMIM शी हातमिळवणी; BJP च्या राजकारणाचा नवा 'अकोट पॅटर्न'
7
बांगलादेशला आयसीसीचा जोर का झटका...! भारतात खेळावेच लागेल, अन्यथा गुण कापणार; बीसीबीची मागणी फेटाळली
8
६० वर्षांनंतर मोठा खुलासा; १३ व्या वर्षी 'त्या' एका पुस्तकाने कसं बदललं शी जिनपिंग यांचं जग?
9
शेअर बाजारात पुन्हा घसरण, Sensex १९७ अंकांची, तर निफ्टीमध्ये ५९ अंकांची घसरण; हे स्टॉक्स आपटले
10
अकोला हादरले! काकाच्या हत्येचा भीषण बदला; काँग्रेसच्या बड्या नेत्याची मशिदीबाहेर हत्या; आरोपीला बेड्या
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, व्हाल मालामाल; वाचवा केवळ ४०० रुपये; मिळेल २० लाख रुपयांचा निधी
12
पत्नी, सासरे ते कर्मचारी... रोहित पवारांनी MCA मध्ये पेरले हक्काचे मतदार; केदार जाधवचा गंभीर आरोप
13
खळबळजनक! नेस्लेच्या बेबी प्रॉडक्टमध्ये घातक विषारी पदार्थ असण्याची शक्यता; कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले
14
१५ लाखांना विकलं, म्यानमारच्या काळकोठडीत छळ सोसला; १३ वर्षांनंतर आईला पाहताच लेक धाय मोकलून रडला!
15
शूटिंग करणाऱ्या सिनेमाच्या क्रू मेंबर्सला बंदी बनवलं; भोपाळमध्ये घडला धक्कादायक प्रकार
16
...तर माझ्यावर महाभियोग आणून हटवतील; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत  
17
अमेरिका आता मोक्याचा ग्रीनलँड गिळंकृत करणार; ट्रम्प यांच्या मनसुब्यांना व्हाईट हाऊसचा हिरवा कंदील, नाटो हादरले...
18
मुकेश अंबानींना ४.३७ अब्ज डॉलर्सचा झटका; गौतम अदानीही टॉप-२० मधून अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर, कारण काय?
19
नात्याला काळिमा! अल्पवयीन मेहुणीला केलं प्रेग्नेंट, बाळ दगावलं अन् नराधम भावोजी फरार!
20
मोठा ट्विस्ट! ‘काँग्रेस का हाथ, भाजप के साथ’; भ्रष्टाचारमुक्त शहराचा नारा, ‘एकनाथां’चा सोडला हात
Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai: अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबाला भाजप पदाधिकाऱ्याची धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 14:23 IST

अल्पवयीन मुलीला व तिच्या कुटुंबीयांना धमकावल्याप्रकरणी भाजपचा अल्पसंख्याक पदाधिकारी व कथित कार्यकर्ता बॉबी शेख व त्याच्या मुलावर गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : अल्पवयीन मुलीला व तिच्या कुटुंबीयांना धमकावल्याप्रकरणी भाजपचा अल्पसंख्याक पदाधिकारी व कथित कार्यकर्ता बॉबी शेख व त्याच्या मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. मुलीचा पाठलाग करून  धमकावल्याप्रकरणी कार्यकर्त्याच्या मुलाची तक्रार करण्यात आली होती. मुलाची पोलिसांकडे तक्रार का केली, याचा जाब विचारत कार्यकर्त्याने पीडित मुलीच्या घरी जाऊन कुटुंबीयांना धमकावले. या प्रकरणात  आधी मुलावर नंतर वडिलांवर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात २१ वर्षीय दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल आहे. त्यापैकी एक आरोपी हा भाजपच्या अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी बॉबी शेख यांचा मुलगा आहे. त्यामुळे आपल्या मुलाविरोधात पोलिसांकडे तक्रार का केली, याचा जाब विचारण्यासाठी त्यांनी थेट पीडित मुलीच्या घरी जाऊन त्यांना धमकावले. याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून कोपरखैरणे पोलिस ठाण्यात बॉबी शेख गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शेख यांच्याकडून आपण भाजपच्या अल्पसंख्याक सेलचे प्रदेश पदाधिकारी असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यांच्याकडील पदाची नवी मुंबईच्या भाजप पदाधिकाऱ्यांकडून पुष्टी होऊ शकली नाही; परंतु त्याला वरिष्ठांकडून नवी मुंबईत पद दिले जात असताना त्यांच्या कार्यपद्धतीची कल्पना देऊन काही सुज्ञ पदाधिकाऱ्यांनी पक्षहित जपल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Navi Mumbai: BJP Official Threatens Minor Victim's Family!

Web Summary : A BJP minority cell official and his son are booked for threatening a minor girl's family in Navi Mumbai after they complained about harassment. The father allegedly confronted the family for reporting his son to the police, leading to charges against both.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र