Navi Mumbai: संदीप नाईक यांच्यावर नवी मुंबई भाजपाची धुरा

By नारायण जाधव | Updated: July 19, 2023 12:17 IST2023-07-19T12:16:23+5:302023-07-19T12:17:18+5:30

Navi Mumbai BJP: नवी मुंबई शहर भाजपा अध्यक्षपदी माजी आमदार संदीप नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज राज्यभरातील विविध जिल्हा, शहर अध्यक्षांची नावे जाहीर केली आहेत.

Navi Mumbai BJP focus on Sandeep Naik | Navi Mumbai: संदीप नाईक यांच्यावर नवी मुंबई भाजपाची धुरा

Navi Mumbai: संदीप नाईक यांच्यावर नवी मुंबई भाजपाची धुरा

नवी मुंबई - नवी मुंबई शहर भाजपा अध्यक्षपदी माजी आमदार संदीप नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज राज्यभरातील विविध जिल्हा, शहर अध्यक्षांची नावे जाहीर केली आहेत. त्यात संदीप नाईक यांच्या नावाची घोषणा केली आहे.

नवी मुंबई भाजपा अध्यक्षपदासाठी आमदार गणेश नाईक व आमदार मंदा म्हात्रे गटात चुरस होती. त्यात नाईक गटाने बाजी मारली आहे. पदवीधर असलेले संदीप नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेत नगरसेवक, स्थायी समितीचे सभापतीपदासह ऐरोलीतून आमदार म्हणूनही काम पाहिले आहे. 

शहर भाजपा अध्यक्षपदासाठी संदीप नाईक यांच्यासह त्यांचे चुलत बंधु सागर नाईक, माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार, मावळते जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत यांच्यासह आमदार मंदा म्हात्रे यांचे पुत्र  माजी नगरसेवक तथा शहर भाजपाचे महामंत्री नीलेश म्हात्रे यांची नावे चर्चेत होती

Web Title: Navi Mumbai BJP focus on Sandeep Naik