शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 21:41 IST

बेलापूरच्या ध्रुवतारा जेट्टीजवळ बाईक खाडी कोसळ्यानंतर एक तरुण बेपत्ता झाला आहे.

Belapur Dhruvatara Jetty:नवी मुंबईत शनिवारी सकाळी झालेल्या एका अपघाताने सर्वांनाच धक्का बसला. बेलापूरमधील ध्रुवतारा जेटीवर बाईक चालवत असताना दोन तरुण अचानक खाडीत कोसळले. बेपत्ता असलेल्या तरुणांचा शोध घेतला असता एकाला तात्काळ वाचवण्यात आलं. तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरु आहे. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीही अशाच एका अपघातात एक महिला गाडीसह ध्रुवतारा जेट्टीवरुन खाडीत कोसळली होती. सुदैवाने तिचा जीव वाचला होता.

ध्रुवतारा जेटीवर शनिवारी पहाटे आणखी एक दुचाकी खाडीच कोसळली. या दुचाकीवर दोन तरुण होते ज्यापैकी एकाला वाचवण्यात यश आलं. शनिवारी पहाटे ५.३० वाजता ही घटना घडली जेव्हा आयटी फर्ममध्ये काम करणारे श्रेयस अशोक जोग (२३) आणि अथर्व शेळके (२३) हे दोन मित्र एका मित्राला भेटण्यासाठी उलवे रोडमार्गे पनवेलला जात होते. ही दुचाकी जोगची होती जो ऐरोलीचा रहिवासी होता. तो ठाण्यातील एका आयटी फर्ममध्ये काम करत होता. तर अथर्व शेळके हा घरून काम करत होता आणि पनवेलमध्ये त्याच्या बहिणीसोबत राहत होता. अपघाताच्या वेळी तो बाईक चालवत होता आणि अजूनही बेपत्ता आहे.

अथर्व शेळके शुक्रवारी डोंबिवलीत होता आणि शुक्रवारी रात्री तो जोगला भेटण्यासाठी त्याच्या ऐरोली येथील फ्लॅटवर गेला होता. तेथून ते बेलापूरला एका मित्राला भेटण्यासाठी गेले होते. आठवड्याचा शेवट असल्याने ते रात्रभर तिथेच राहिले आणि शनिवारी  ते पनवेलला निघाले होते, अशी माहिती बेलापूर पोलिसांनी दिली.

पनवेलकडे जात असताना अथर्व शेळके  उड्डाणपुलावरुन जाण्याच्या ऐवजी जेट्टीकडे जाणाऱ्या रस्त्याने गेला. तिथे रस्ता बंद असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले होते. मात्र त्यांना ते दिसले नाही आणि ते रस्त्यावरून वेगाने गेले आणि त्यांची बाईक खाडीत कोसळली. सागरी सुरक्षा पोलिसांची चौकी त्याच ठिकाणी असल्याने त्यांनी ही घटना पाहिली आणि अटल सेतू बचाव पथकाला माहिती दिली. त्यानंतर पथकाने जोगला वाचवले आणि दुचाकी बाहेर काढली. बचाव पथकाने तात्काळ शेळकेचा शोध सुरु केला. मात्र अद्यापही त्याचा शोध लागलेला नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bike plunges into Belapur creek; one rescued, one missing.

Web Summary : A bike accident in Belapur creek led to one rescue and one missing person. Two friends traveling to Panvel plunged into the creek. One was saved, but the other is still missing as search operations continue.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAccidentअपघातPoliceपोलिस