शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आंदोलनापूर्वीच नवी मुंबई विमानतळाचे काम ‘बंद’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 08:20 IST

दि. बा. पाटील यांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्त एकत्र

लोकमत न्यूज नेटवर्क पनवेल : नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटलांचे नाव देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून सोमवारी आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने प्रकल्पग्रस्त ओवळेफाटा याठिकाणी एकत्र आले होते. मात्र, आंदोलनापूर्वीच विमानतळाचे काम कंत्राटदारांनी बंद ठेवले होते. आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव देण्यास येथील प्रकल्पात विस्थापित होत असलेल्या स्थानिक ग्रामस्थांच्या मागण्यांसंदर्भात हे आंदोलन पुकारण्यात आले होते. ओवळेफाटा याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सभेत प्रकल्पग्रस्त नेत्यांची भाषणे पार पडली. 

या सभेत नेत्यांच्या भाषणात मोठ्या प्रमाणात सिडकोविरोधात नाराजीचा सूर उमटला. दरम्यान, या सभेला मार्गदर्शन करताना कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी विमानतळाच्या साइटवर काम बंद पाडण्यासाठी सर्वप्रथम पाच जणांचे शिष्टमंडळ जाईल, असे सांगितल्यावर प्रकल्पग्रस्तांच्या एका गटाने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. विमानतळाच्या कामाच्या ठिकाणी सर्व जणांनी जाऊन हे काम एका दिवसासाठी नाही, तर कायमस्वरूपी बंद पाडण्याचा आग्रह प्रकल्पग्रस्तांच्या एका गटाने धरला. दरम्यान, पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने काही प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींनी काम बंद असल्याची खात्री केली. यामध्ये आमदार महेश बालदी यांचा समावेश होता. या मोर्चात मोठ्या संख्येने महिलांचा समावेश होता. मात्र, शेवटच्या टप्प्यात नेत्यांच्या भाषणादरम्यानच आंदोलकांनी घरचा रस्ता धरण्यास सुरुवात केली. 

एक महिन्याची मुदतमहिनाभरात सिडको प्रशासनाने दहा गावांतील विस्थापित झालेल्या ग्रामस्थांच्या मागण्या मान्य न केल्यास तसेच सिडकोने दि.बां.च्या नावाबाबत आपली भूमिका न घेतल्यास २४ फेब्रुवारी रोजी विमानतळाचे काम कायमस्वरूपी बंद पाडण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त कृती समितीने दिला आहे.

सिडकोच्या एमडींना बंगालीमध्ये आवाहनसिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी हे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ॲडव्होकेट विक्रांत घरत यांनी केला. यावेळी बंगाली भाषिक असलेल्या डॉ. मुखर्जींना कर्बो, लोर्बो, जीतबो असे सांगत, आम्ही लढाई जिंकणारच, असे सांगितले.

११०० पोलिसांचा फौजफाटाया सभेवेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा ठेवण्यात आला होता. जवळपास ११०० पोलिसांचा ताफा या ठिकाणीबंदोबस्तासाठी ठेवण्यात आला होता.पोलीस उपायुक्त शिवराज पाटील हे स्वतः आंदोलनावर लक्ष ठेवून होते. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्याAirportविमानतळ