नवी मुंबईत दोन मतदारसंघातून ६७ जणांनी घेतले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 03:16 AM2019-10-02T03:16:37+5:302019-10-02T03:16:50+5:30

ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदारसंघातून ६७ उमेदवारांनी तब्बल १२० उमेदवारी अर्ज घेतले आहेत.

Navi Mumbai 2 assembly constituencies news | नवी मुंबईत दोन मतदारसंघातून ६७ जणांनी घेतले अर्ज

नवी मुंबईत दोन मतदारसंघातून ६७ जणांनी घेतले अर्ज

Next

नवी मुंबई : ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदारसंघातून ६७ उमेदवारांनी तब्बल १२० उमेदवारी अर्ज घेतले आहेत. मंगळवारी बेलापूर मतदारसंघातील दोघांनी अर्ज भरले आहेत. अद्याप एकही प्रमुख उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नसून बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या दोन दिवसांत अर्ज दाखल केले जाणार आहेत.

नवी मुंबईमधील दोन्ही मतदारसंघामध्ये अद्याप सर्व पक्षांचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत. सर्व प्रमुख पक्षाच्या नेत्यांसह अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या प्रमाणात अर्ज घेतले आहेत. बेलापूरमधून भाजपच्या मंदा म्हात्रे, गणेश नाईक, शिवसेनेचे विजय नाहटा, राष्ट्रवादी काँगे्रसचे अशोक गावडे, यांच्यासह तब्बल ३४ जणांनी ६१ अर्ज घेतले आहेत. ही संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारी युवा जनकल्याण पक्षाचे अजयकुमार उपाध्याय व अपक्ष उमेदवार संतोष कांबळे या दोघांनी अर्ज भरला आहे. राष्ट्रवादी काँगे्रस व भाजपचे उमेदवार गुरुवारी अर्ज भरणार आहेत. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार अर्ज भरणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

ऐरोली मतदारसंघातून ३३ उमेदवारांनी ५९ अर्ज घेतले आहेत. भाजपच्या वतीने संदीप नाईक यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. शिवसेनेच्याही काही पदाधिकाऱ्यांनी अर्ज घेऊन ठेवले आहेत. भाजपचा उमेदवार निश्चित झाला असून विरोधात राष्ट्रवादी काँगे्रसचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. गुरुवारी व शुक्रवारी प्रमुख पक्षांचे उमेदवार अर्ज सादर करणार आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी प्रमुख पक्षाचे उमदेवार शेवटच्या दोन दिवसांत अर्ज भरणार आहेत.

प्रमुख पक्षाच्या नेत्यांसह अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या प्रमाणात अर्ज घेतले आहेत. गुरुवारी राष्टÑवादी काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांकडून अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे.


पनवेलमध्ये दोन उमेदवारी अर्ज दाखल
पनवेल : १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघात मंगळवारी दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अपक्ष अरुण म्हात्रे व बहुजन समाज पक्षाचे फुलचंद किटके यांनी हे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
पनवेल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत २८ नामनिर्देशित अर्जाचे वाटप करण्यात आले आहे. ४ आॅक्टोबर अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. अर्ज भरण्यासाठी तीन दिवस शिल्लक असल्याने पुढील तीन दिवसांत मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
पनवेलमध्ये शेकाप विरुद्ध भाजप अशी लढत रंगणार आहे. भाजपच्या वतीने विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर तर शेकापच्या वतीने नगरसेवक हरेश केणी यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. शिवसेनेची भाजपसोबत युती असल्याने शिवसैनिकांना प्रशांत ठाकूर यांचा प्रचार करावा लागणार आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत शेकापची आघाडी असल्याने दोन्ही काँग्रेस शेकापसोबत असणार आहेत.
 

Web Title: Navi Mumbai 2 assembly constituencies news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.