महापालिका सुरू करणार बर्तनघर; महासभेत प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:08 IST2019-11-17T00:08:09+5:302019-11-17T00:08:18+5:30
नवी मुंबई शहर स्वच्छतेसाठी उपक्रम

महापालिका सुरू करणार बर्तनघर; महासभेत प्रस्ताव
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात विविध कार्यक्र माच्या माध्यमातून जेवणावळी होतात. प्रत्येक ठिकाणी भांडी उपलब्ध नसल्याने प्लास्टिक कोटेड पेपरप्लेटचा वापर केला जातो, यामुळे कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. यावर उपाय तसेच नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रत्येक विभाग कार्यालयाच्या माध्यमातून एक बर्तनघर सुरू करावे, अशी मागणी नगरसेविका सरोज पाटील यांनी महासभेच्या ठरावाच्या माध्यमातून केली आहे.
नवी मुंबई शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून, स्वच्छतेसाठी महापालिकेने विविध उपाययोजनाही केल्या आहेत. शहरात मध्य आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून छोटेखानी पार पडणाºया कार्यक्रमांना जेवणावळी होतात. या कार्यक्र मांना ताट, वाट्या, लोटे, भांडी आदी साहित्य उपलब्ध नसल्याने बाजारात उपलब्ध असलेल्या प्लास्टिक कोटेड पेपरप्लेटचा आधार घ्यावा लागतो. यामुळे कचºयाचे साम्राज्य पसरते. इंदोर महापालिकेच्या धर्तीवर प्रत्येक विभाग कार्यालयाच्या माध्यमातून एक बर्तनघर सुरू करण्यात यावे, या बर्तनघरातून ४०० ते ५०० नागरिकांना जेवण्यासाठी लागणारी ताटे, वाट्या, लोटे, भांडी, असे साहित्य नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात यावे. यामुळे स्वच्छ शहर अभियानाला मोठा हातभार लागणार असून कार्यक्रमांसाठी शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार असल्याचे नगरसेविका पाटील यांनी म्हटले आहे.