मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तास बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 10:03 IST2019-01-10T08:38:31+5:302019-01-10T10:03:00+5:30
मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक आज दोन तासांसाठी बंद असणार आहे. पुणे कॉरिडॉरवर 17/695 आणि 23/870 येथे ओव्हर हेड गँटिज बसवण्याचे काम केले जाणार आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तास बंद राहणार
ठळक मुद्देमुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक आज दोन तासांसाठी बंद असणार आहे.पुणे कॉरिडॉरवर 17/695 आणि 23/870 येथे ओव्हर हेड गँटिज बसवण्याचे काम केले जाणार आहे. पुण्याला जाणारी वाहतूक रसायनी-माडपदरम्यान बंद असणार आहे.
पनवेल - मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक आज दोन तासांसाठी बंद असणार आहे. पुणे कॉरिडॉरवर 17/695 आणि 23/870 येथे ओव्हर हेड गँटिज बसवण्याचे काम केले जाणार आहे. पुण्याला जाणारी वाहतूक रसायनी-माडपदरम्यान बंद असणार आहे.
गुरुवारी (10 जानेवारी) दुपारी 12 ते 2 या वेळेत हे काम केले जाणार आहे. यादरम्यान सदर मार्ग वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता आहे. महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवावी अशा सूचना वाहतूक पोलिसांनी ठेकेदाराला केल्या आहेत.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज दोन तास वाहतूक बंद राहणार, ओव्हरहेड गँट्रीज बसवण्यासाठी दुपारी 12 ते 2 दरम्यान वाहतूक बंद
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) January 10, 2019