शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन, प्रवास केवळ साडेतीन तासांचा; प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 06:54 IST

१.७० लाख कोटी खर्च, १३ जिल्ह्यांचा विकास सुसाट

- नारायण जाधवनवी मुुंबई : आर्थिक राजधानी मुंबईहून उपराजधानी नागपूरला अवघ्या साडेतीन तासांत पोहोचता येणार आहे. या दोन मोठ्या शहरांना कनेक्ट करणाऱ्या मुंबई-नागपूरबुलेट ट्रेन प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल रेल्वे बोर्डाने रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे. या मार्गामुळे राज्यातील १३ जिल्ह्यांचा  विकास सुसाट होण्यास मदत होणार आहे.

अहमदाबादनंतर राज्यांतर्गत हा पहिलाच बुलेट प्रकल्प असून, तो समद्धी महामार्गाला समांतर  असा राहणार आहे.  या मार्गाची लांबी ७६६ किलोमीटर असणार आहे. हा मार्ग ६८ टक्के समृद्धी महामार्गाला समांतर असून १,२६० हेक्टर जमिनीची गरज संपादित करावी लागेल. हा प्रकल्प राज्यातील अकरा जिल्ह्यांमधून जाणारा असून, याव्यतिरिक्त इतर १३ जिल्ह्यांना त्याचा अप्रत्यक्षपणे फायदा होणार आहे.

मुुंबई-नागपूर प्रकल्पाचा प्रस्ताव २०१९ मध्ये तयार करून २०२१ मध्ये त्याचा हवाई लीडार सर्वेक्षणदेखील केले होते. त्यानुसार नोव्हेंबर २०२१ पासून या प्रकल्पाचा डीपीआर बनविण्याला सुरुवात झाली. त्यानंतर तो मार्च २०२२ मध्ये रेल्वे बोर्डाला सादर केला होता. आता बोर्डाने रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे. रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होईल.

या बुलेट ट्रेन मार्गावर १३ स्थानके

या बुलेट ट्रेन मार्गावर १३ स्टेशन प्रस्तावित आहेत. यामध्ये मुंबई, शहापूर, इगतपुरी नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, जालना, मेहकर, मालेगाव जहाँगीर, कारंजा लाड, पुलगाव, वर्धा, खापरी आणि अजनी या शहरांचा यामध्ये समावेश आहे.

दहा तासांचा वेळ वाचणारसध्या जर आपण नागपूर ते मुंबईदरम्यानचा प्रवासाचा वेळ पाहिला तर तो बारा ते पंधरा तास इतका लागतो; परंतु हा बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू झाल्यानंतर अवघ्या साडेतीन तासांमध्ये हे अंतर कापता येणार आहे.

प्रतिकिमी २३२ कोटी रुपये खर्चाचा अंदाजप्रकल्पाकरिता लागणारा खर्च हा एका किलोमीटरकरिता २३२ कोटी रुपये इतका येईल, असा अंदाज  आहे. त्यानुसार एकूण एक लाख ७० हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. 

ठाणे जिल्ह्यातील मोठी जमीन होणार बाधितठाण्यातील म्हातार्डी, बेतवडे, आगासन, उसरघर, काटई, नारिवली, निघू, बमाली, निळजे, घेसर, वडवली (ख.) या गावांची जमीन या प्रकल्पात जाणार आहे. तर मुंबई-नागपूर मार्गात नाशिकच्या पुढे औरंगाबादसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतून ती न्यावी की नाही, यावरून राज्यकर्त्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांत अजूनही मतभेद आहेत. तसेच ठाणे जिल्ह्यातील उपरोक्त गावांव्यतिरिक्त कल्याणपुढील नाशिकपर्यंतची अनेक गावांची जमीन मुंबई-नागपूर मार्गात बाधित होणार आहे. 

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनnagpurनागपूरMumbaiमुंबई